अनुष्का शर्माने ३ इडियट्स चित्रापटासाठी दिले होते ऑडिशन; ऑडिशनचा व्हिडिओ होतोय व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जी नेहमीच कोणत्याना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असते. आता अनुष्का शर्माचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

आमिर खानचा चित्रपट ३ इडियट्सचे ऑडीशन अनुष्का शर्माने दिले होते. तिच्या ऑशिनचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अनुष्का शर्मा मुन्नाभाई एमबीबीएसचा एक डायलॉग बोलताना ती दिसून येत आहे.

अनुष्का शर्मा या व्हिडिओमध्ये खुप तरुण दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती ग्रीन टॉप घातलेला दिसून येत आहे. अनुष्का शर्माचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडला असून अनेक चाहत्यांनी तिला प्रतिक्रिया दिल्या आहे.

अनुष्का शर्माच्या ऑडिशननंतर तिचे या चित्रपटासाठी सिलेक्शन नव्हते झाले. त्यानंतर ती पाच वर्षांनंतर राजकुमार हिराणीचा चित्रपट पीकेमध्ये आमिर खानसोबत दिसून आली होती. पीकेमध्ये तिने एक पत्रकाराची भुमिका निभावली होती.

अनुष्का शर्माने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्याशी २०१७ मध्ये लग्न केले होते. अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल बोलाल, तर तिचा शेवटचा चित्रपट झीरो होता, या चित्रपटात तिने शाहरुख खानसोबत काम केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत कटरीना कॅफ पण दिसून आली होती.

अनुष्काच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये नुकताच बुलबुल हा चित्रपट तयार करण्यात आला होता. हा चित्रपट नेटफ्लिक्स रिलिज करण्यात आला होता. याआधी अनुष्का शर्माने पाताल लोक ही वेबसिरिज प्रोड्युस केली होती. या वेब सिरिजला लोकांनी खुप चांगला प्रतिसाद दिला होता.

महत्वाच्या बातम्या-

राजेंद्र कुमारला बघण्यासाठी पागल झाले होते लोकं; पोलिसांनी लाठीचार्ज करुन सांभाळली होती परिस्थिती
जाणून घ्या ७० च्या दशकातील टॉपच्या अभिनेत्री मौसमी चॅटर्जीची कहानी
बेड न मिळाल्यामुळे मृत्यू झालेल्या भाजप आमदाराचा मुलगा मोदींवर संतापला; म्हणाला कित्येक फोन केले पण..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.