मिसेस कोहली बनण्यापूर्वी अनूष्का शर्माचे होते अनेक अफेअर्स; नाव वाचून धक्काच बसेल

बॉलीवूड अभिनेत्री अनूष्का शर्मा आणि इंडियन क्रिकेट टिमचा कर्णधार विराट कोहलीच्या जोडीला चाहते खुप पसंत करतात. त्यांच्या चाहत्यांनी त्यांना विरुष्का नाव दिले आहे. दोघांची जोडी फिल्म इंडस्ट्रीसोबतच क्रिकेटच्या जगातही खुप प्रसिद्ध आहे.

२०१३ मध्ये दोघांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात झाली होती. मैत्रीपासून सुरु झालेले हे नातं. २०१८ मध्ये लग्नापर्यंत जाऊन पोहोचले. २०१८ मध्ये धुमधडाक्यात दोघांची इटलीमध्ये लग्न केले होते. त्यांच्या लग्नाच्या चर्चा खुप मोठ्या प्रमाणावर झाल्या होत्या. लग्नानंतर ही जोडी चाहत्यांची आवडती जोडी बनली आहे.

विराट आणि अनूष्काच्या लग्नाच्या अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर उपलब्ध आहेत. विरुष्काबद्दल कोणतीही बातमी असेल तर ती लगे व्हायरल होते. सध्या दोघे त्यांची मुलगी वामिकाचा सांभाळ करण्यात व्यस्त आहेत. अनूष्काने काही दिवसांपूर्वीच मुलगी वामिकाला जन्म दिला आहे.

विराट आणि अनूष्काची जोडी आजच्या घडीची सर्वात प्रसिद्ध आणि हिट जोडी आहे. आज विराट कोहलीची बायको म्हणून मिरवणारी अनूष्का एकेकाळी दुसऱ्या क्रिकेटरच्या प्रेमात पडली होती. फक्त क्रिकेटरच नाही तर अनेकांसोबत तिचे नाव जोडले गेले होते. जाणून घेऊया अनूष्का शर्माच्या लव्ह स्टोरीबद्दल.

सोहेब युसूफ – मॉडेलिंगच्या दिवसांमध्ये अनूष्का मॉडेल सोहेब युसूफच्या प्रेमात पडली होती. दोघेही मॉडेलिंगच्या जगातले प्रसिद्ध नाव होते. दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. पण हे नातं काही दिवसांचे होते. अनूष्काने फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला. त्यानंतर दोघे वेगळे झाले.

रणवीर सिंग – रब ने बना दी जोडी चित्रपटाच्या यशानंतर अनूष्काने रणवीरसोबत बॅन्ड बाजा बारात चित्रपट केला. या चित्रपटाच्या शुटींग वेळी दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पण हे नातं फक्त काही दिवसांचे होते. चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही दिवसांमध्येच दोघे वेगळे झाले.

रणबीर कपूर – रणबीर कपूरचे नाव या यादीत बघून तुम्हाला धक्का बसला असेल पण हे खरे आहे. करणं जोहरच्या एका पार्टीमध्ये दोघांची भेट झाली होती. तेव्हापासूनच दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. पण रणबीर कपूरच्या दिलफेक स्वभावामूळे दोघे वेगळे झाले आणि मित्र म्हणून राहू लागले.

शाहिद कपूर – अभिनेता शाहिद कपूरचे नाव देखील या यादीत येते. बदमाश कंपनी चित्रपटामध्ये दोघांनी एकत्र काम केले होते. त्यावेळी दोघांच्या अफेअरच्या बातम्यांनी बाजार गरम केले होते. पण हे नाते देखील जास्त काळ टिकले नाही. काही दिवसातच दोघे वेगळे झाले.

सुरैश रैना – विराट कोहलीच्या अगोदर अनूष्काचे नाव सुरैश रैनासोबत जोडले गेले होते. दोघांच्या अफेअरच्या बातम्यांनी सगळीकडे आग लावली होती. क्रिकेटच्या विश्वात दोघांच्या अफेअरने सगळेजण पागल झाले होते. पण हे ही नाते जास्त काळ टिकू शकले नाही. त्यांचे ब्रेकअप झाले आणि अनूष्का विराटच्या प्रेमात पडली.

महत्वाच्या बातम्या –
…म्हणून मुलाच्या लग्नात दुखी होत्या शर्मिला टागोर; स्वत: सांगितले कारण
एकेकडे डिंपल कपाडीया आणि राजेश खन्नाचे लग्न सुरु होते तर दुसरीकडे डिंपलच्या आई रडत बसल्या होत्या कारण…
बॉलीवूडच्या अभिनेत्रीच नाही तर ‘या’ अभिनेत्यांनी देखील केला आहे रंगभेदाचा सामना
‘तारक मेहता..’ मालिकेत दयाबेन कधी येणार? निर्माते असीम मोदींनी स्पष्टच सांगीतलं..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.