विराटच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या अनुष्काने ‘तो’ फोटो शेअर करत , म्हणाली….

व्हॅलंटाईन डे दिवशी प्रत्येकजण आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असतो. यामध्ये सर्व सामान्यांबरोबरच सिनेकलाकार, राजकीय नेते, उद्योगपती आपल्या आयुष्यातील खास व्यक्तीसोबत फोटो काढून शेअर करत असतात.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानेही पती विराटसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यात तिने म्हटले की, मी या दिवसाला जास्त महत्त्व देत नाही, परंतू सनसेटचा हा फोटो शेअर करणे मला जास्त महत्वपुर्ण वाटतं, माझ्या प्रत्येक दिवसाचा हा व्हॅलंटाईन. असं अनुष्काने लिहलं आहे.

 

 

फोटोमध्ये पाहू शकता की विराट आणि अनुष्का समुद्रकिनारी उभे आहेत आणि ते एकमेकांकडे पाहत आहेत. तसेच सुर्य मावळतानाचे नयनरम्य दृश्य दिसत आहे.

विराट कोहली सध्या चेन्नईत इंग्लंडसोबत सुरू असलेल्या कसोटी सामन्यात खेळत आहे. त्यामुळे विराटला पत्नी अनुष्कासोबत व्हॅलंटाईन डे साजरा करता आला नाही. दरम्यान या फोटोवर त्यांच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. त्यांच्या या फोटोची चर्चा सध्या सोशल मिडियावर होत आहे.

बॉलिवूडमधील सर्वात सुंदर जोडी म्हणून विराट अनुष्काकडे पाहिले जाते. 11 जानेवारी रोजी त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. मुलीचे नाव त्यांनी वामिका असं ठेवलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
बाहुबली प्रभासला लॉकडाऊनचा जबर फटका, कंपनीवर आहे १००० कोटींचे कर्ज
दिवंगत अभिनेता चिरंजीवीच्या मुलाला पाहिलेत का?, व्हिडीओ पाहून चाहते झाले भावुक
व्हॅलेंटाईन डे दिवशी जुळल्या रेशीमगाठी; बिग बॉसच्या घरात आणखी एक जोडी जुळली
वरुण धवनच्या बायकोने त्याला तीन वेळा केले होते रिजेक्ट; वाचा लव्ह स्टोरी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.