रणबीर कपूरच्या ‘त्या’ एका वाईट सवयीला वैतागली आहे फिल्म इंडस्ट्री; अनूष्का शर्माने केला खुलासा

फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक जोड्या आहेत. ज्यांची एकमेकांशी खुप चांगली मैत्री आहे. अशीच एक जोडी म्हणजे रणबीर कपूर आणि अनूष्का शर्माची. दोघेही एकमेकांचे खुप चांगले मित्र आहेत. त्यांच्या मैत्रीचे किस्से व्हायरल होत असतात.

अनूष्का आणि रणबीरची पहीली भेट करण जोहरच्या पार्टीमध्ये झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. अनेकदा त्यांना एकत्र पाहीले जाऊ लागले होते. दोघांनी ‘बॉम्बे वेलवेट’ चित्रपटामध्ये पहील्यांदा एकत्र काम केले होते. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. दोघांची जोडी हिट ठरली.

प्रेक्षकांना रणबीर अनूष्काची जोडी आवडली. म्हणून त्या दोघांना करण जोहरने ‘ये दिल है मुश्किल’ चित्रपटामध्ये घेतले. हा चित्रपट हिट झाला आणि दोघांची जोडी देखील हिट झाली. दोघे अनेकदा एकमेकांबद्दल बोलत असतात.

एका मुलाखतीमध्ये अनूष्काने रणबीरबद्दल अनेक खुलासे केले होते. तिने रणबीरला तरुणांचा सोनम कपूर असे संबोधले होते. त्यासोबतच तिने रणबीरची सर्वात वाईट सवय देखील सांगितली होती. ज्यामूळे लोकं त्याला नेहमी ओरडत असतात.

अनूष्का म्हणाली की, ‘रणबीर कपूर तरुणांचा सोनम कपूर आहे. कुठेही गेला तरी तो खुप शॉपिंग करतो. त्यामूळे त्याच्या बॅगा उचलण्यासाठी माणसं लागतात. त्यासोबतच त्याची सर्वात वाईट सवय म्हणजे तो लोकांच्या रुममध्ये गेल्यानंतर त्यांचे सगळे सामान चेक करतो. त्याच्या या सवयीला सगळी इंडस्ट्री वैतागली आहे’.

सोनम कपूर बॉलीवूडची स्टायलिश स्टार आहे. तिच्या फॅशनचे हजारो चाहते आहेत. सोनम कपूर कुठेही गेली तरी खुप जास्त शॉपिंग करत असते. रणबीरला देखील तशीच सवय आहे. त्यामूळे अनूष्का त्याला तरुणांचा सोनम कपूर म्हणाली होती.

रणबीर आणि अनूष्काच्या जोडीला चाहते खुप पसंत करतात. त्यांचा ये दिल है मुश्किल चित्रपट सुपरहिट झाला होता. या चित्रपटामध्ये ऐश्वर्या राय देखील काम करत होती. पण अनूष्का रणबीरच्या जोडीची जास्त चर्चा झाली होती.

महत्वाच्या बातम्या –

६९ वर्षांच्या झीनत अमानचा ‘लैला ओ लैला’ गाण्यावर जबरदस्त डान्स; पहा व्हिडीओ

विराट कोहलीने अनुष्का आणि वामिकाला दिल्या महिलादिनाच्या खास शुभेच्छा, म्हणाला….

इशा गुप्ताच्या बेडवरील ‘त्या’ फोटोने चाहत्यांना केले पागल; पहा तो खास फोटो

‘कुमकूम भाग्य’ फेम अभिनेत्री स्रीती झा आहे करोडोंच्या संपत्तीची मालकिण; पहा तिच्या आलिशान घराचे फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.