‘शुटिंगदरम्यान आत्मविश्वास वाढविण्यासाठी कंगना करायची ‘हे’ काम’

मुंबई | कंगना तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असते. सध्या तिने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तिने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, शूटिंगला जाता येऊ नये म्हणून मला ड्रग्स दिले जायचे. तिच्या या वक्तव्यावर दिग्दर्शक अनुराग कश्यपने प्रश्न उपस्थित केले आहेत.

एखादा व्यक्ती स्वतः पर्याय निवडतो त्याला तो पर्याय निवडण्यासाठी कोणी बळजबरी करत नाही. असं म्हणत अनुरागने शूटिंगदरम्यानचा अनुभव सांगितला आहे. पत्रकार फाये डीसुझाला दिलेल्या मुलाखतीत अनुराग कश्यप बोलत होता.

तो म्हणाला की, क्वीन चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कंगना तिचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी शँपेन प्यायची. बळजबरीने काही होऊ शकत असं मला वाटत नाही कारण मी स्वतः तिला अशा गोष्टी करताना पाहिले होते. त्यासाठी तिला कोणी बळजबरी केली नव्हती.

गेल्या काही दिवसांपासून कंगना आणि अनुराग कश्यप यांच्यात ट्विटरवॉर सुरू आहे. मी क्षत्रीय आहे. मी शिरच्छेदाला सामोरं जाईन पण कधी माझी मान झुकवणार नाही”, असं ट्विट कंगनाने केलं होतं.

त्यावर उत्तर देताना अनुराग कश्यपने ट्विट केले होते की, तू चार पाच जणांना घेऊन भारत सिमेवर लढण्यासाठी जा. तुझ्या घरापासून ते जवळच आहे. असा टोला अनुरागने कंगनाला लगावला होता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.