“सुशांत टीव्ही अभिनेता असल्यामुळे ‘या’ अभिनेत्रीने त्याच्याबरोबर काम करण्यास नकार दिला होता”

मुंबई | सध्या अनुराग कश्यप आणि कंगना राणावत यांच्यात ट्विटरवॉर सुरू आहे. याचदरम्यान अनुराग कश्यपने एका मुलाखतीत बोलताना सुशांतच्याबद्दल एक खुलासा केला होता. अनुरागला सुशांतसोबत काम करायचं नव्हतं कारण तो कामाच्या दरम्यान कोणती ना कोणती अडचण उभी करायचा.

अनुराग कश्यपने २०१४ मध्ये हंसी तो फंसी या सिनेमासाठी सुशांत सिंह राजपुतचे नाव घेतले होते. त्यानंतर तो फक्त अभिनेत्रीच्या शोधात होता म्हणून त्याने परिणीती चोप्राला विचारले. पण जेव्हा अनुरागने सुशांतचे नाव घेतले असता परिणीती म्हणाली की, मी टीव्ही अभिनेत्यासोबत काम करणार नाही.

अनुरागने तिला सांगितले की, सुशांत केवळ टीव्ही अभिनेता नाहीये तर त्याने काय पो छे, पीके सारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. परिणीती त्या वेळी यशराजच्या शुद्ध देसी रोमान्स या चित्रपटात काम करत होती. परिणीतीने यशराज फिल्म्सशी चर्चा केली.

त्यानंतर यशराज फिल्म्सने सुशांतला त्या फिल्मची ऑफर दिली आणि त्यानंतर सुशांतने आमच्याशी काहीच संपर्क साधला नाही. सुशांतला त्या वेळी यशराजबरोबर काम करणं योग्य वाटलं. या दोन्ही चित्रपटात परिणीतीची मुख्य भूमिका होती.

परिणीतीने या दोन्ही चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. तिने हंसी तो फंसी या चित्रपटात सिध्दार्थ मल्होत्राबरोबर काम केले आणि शुद्ध देसी रोमान्समध्ये सुशांतबरोबर काम केले लोकांना शुद्ध देसी रोमान्समध्ये सुशांतची भूमिका आवडली होती. असा खुलासा अनुरागने एका मुलाखतीत केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

अनुरागवरच्या बलात्काराच्या आरोपांवर त्याची घटस्फोटीत बायको कल्की कोचलीन म्हणते..

..म्हणून क्वीनच्या शुटिंगदरम्यान कंगना प्यायची शॅम्पेन; अनुरागने फोडले गुपित

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.