नागराज मंजुळेने दिग्दर्शित केलेला आणि अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला ‘झुंड’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ‘झुंड’ चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षक या दोन्हींची पसंती मिळत आहे. अभिनेता अमीर खानने देखील या चित्रपटाचे विशेष कौतुक केले आहे. काही दिवसांपूर्वी ‘झुंड’ चित्रपटाचे बॉलिवूडमधील दिग्दर्शकांसाठी विशेष स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं.( anurag kashyap reaction zhund movie)
यावेळी बॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शकांनी हा चित्रपट पहिला आणि त्याचे कौतुक देखील केले. दिग्दर्शक अनुराग कश्यपने देखील ‘झुंड’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी उपस्थित होता. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनुराग कश्यप स्तब्ध झाला आणि त्याने दिग्दर्शक नागराज मंजुळेला मिठी मारली. त्यावेळी दिग्दर्शक अनुराग कश्यप भावुक झाला होता.
या चित्रपटावर प्रतिक्रिया देताना दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणाला की, “मी आतापर्यंत पाहिलेल्या सिनेमांमध्ये झुंड हा सर्वाधिक चांगला सिनेमा आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर प्रेक्षकांच्या रांगा लागतील.” यावेळी अनुराग कश्यप यांनी ‘झुंड’ चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे तोंडभरून कौतुक केले.
हा सिनेमा पाहिल्यानंतर मला पुन्हा एकदा जाऊन फिल्ममेकिंग शिकावंस वाटतं आहे, असे दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणाले. यावेळी अनुराग कश्यप यांनी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना मिठी मारली. दिग्दर्शक अनुराग कश्यप पुढे म्हणाले की, “हा सिनेमा पाहिल्यानंतर मला पुन्हा एकदा जाऊन फिल्ममेकिंग शिकावंस वाटतं आहे.”
“हा सिनेमा कमाल आहे. या सिनेमाच्या कास्टिंग डिरेक्टरला विशेष पुरस्कार दिला पाहिजे, कारण सिनेमातील कास्ट अप्रतिम आहे”, असे देखील अनुराग कश्यप म्हणाले आहेत. ‘तानाजी’ चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत म्हणाले की, “प्रत्येक भारतीयाने हा सिनेमा बघायला पाहिजे.” दिग्दर्शक संदीप वैद्य यांनी देखील ‘झुंड’ चित्रपटाचे कौतुक केले.
“झुंड हा चित्रपट मास्टरपीस आहे”, अशी प्रतिक्रिया मिलाप झवेरी यांनी दिली आहे. ‘झुंड’ हा सिनेमा झोपडपट्टीत राहणारी मुलं आणि त्यांचे क्रीडा प्रशिक्षक यांच्यावर बेतलेला आहे. अमिताभ बच्चन या चित्रपटात क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. हा सिनेमा सत्य कथेवर प्रेरीत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ६ कोटींची कमाई केली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
तुमच्याकडे कार असो वा बाईक, १ एप्रिलपासून या झटक्यासाठी राहा तयार, खिशावर येणार ताण
बंपर ऑफर! WagonR ते Swift पर्यंत ‘या’ मॉडेल्सवर भेटत आहे तब्बल ४१ हजारांपर्यंत सुट, ऑफर फक्त मार्चपर्यंत
शाहरूखने मारला मोठा हात, पठाण चित्रपटासाठी दिपीका आणि शाहरूखने घेतली तब्बल ‘एवढी’ फी