Anupam Kher : बॉलिवूडमध्ये एखादा चित्रपट हिट होणे तर एखादा फ्लॉप होणे हे सतत सुरूच असते. अशातच आता “लाल सिंग चड्डा” हा आमिर खानचा चित्रपट रिलीज झाल्यापासून त्यावर प्रचंड टीका होताना दिसत आहेत. तसेच या चित्रपटाला बॉयकॉट ट्रेंडचाही सामना करावा लागत आहे.
यावर अभिनेते अनुपम खेर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या सगळ्या परिस्थितीला स्वतः आमिर खान जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आमिर खानने केलेले मागील काही वक्तव्य याला कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
‘जर कुणाला वाटत असेल की, त्यांनी ट्रेंड सुरू करावा, तर ते तसे करण्यास मोकळे आहेत. ट्विटरवर रोज नवनवीन ट्रेंड येत असतात. पण जर तुम्ही काही वक्तव्ये केली असतील, तर त्याचे परिणाम नंतर नक्कीच त्रासदायक असतील.’ असे म्हणत अनुपाम खेर यांनी “लाल सिंग चड्डा” च्या बॉयकॉट ट्रेंडसाठी आमिर खानला जबाबदार धरले आहे.
यासोबतच आमिर खानचे देश सोडण्याबाबतचे वक्तव्यही मागे चांगलेच गाजले होते. त्यावेळी “देशामध्ये असुरक्षित वातावरण आहे. त्यामुळे माझी पत्नी किरण हिला आमच्या मुलांची काळजी वाटते. म्हणून तिने माझ्याकडे देश सोडून जाण्याचे बोलून दाखवले.” असे वक्तव्य आमिर खानने केले होते.
आमिरने केलेले मागील काही वक्तव्य हे या बॉयकॉट ट्रेंडला कारणीभूत असल्याचे अनुपम खेर म्हणाले आहेत. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी बॉयकॉट ट्रेंडवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘दिल’, ‘दिल है की मानता नही’ या चित्रपटांमध्ये आमिर खान आणि अनुपम खेर यांनी एकत्र काम केले आहे.
‘लाल सिंग चड्ढा’ सोबतच ‘रक्षा बंधन’, ‘लायगर’, ‘पठाण’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटांनादेखील बॉयकॉट ट्रेंडचा सामना करावा लागत आहे. “लालसिंग चड्डा” हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही. त्यामुळे तो फ्लॉप ठरला आहे.
महत्वाच्या बातम्या
शिंदे गटाची वाटचाल भाजपमध्ये विलीन होण्याच्या दिशेने? भावना गवळींच्या बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा
Harshvardhan Patil : शेतकऱ्याचा संताप अनावर, भाजपच्या हर्षवर्धन पाटलांच्या कारखान्याच्या कार्यालयाची केली तोडफोड, वाचा सविस्तर..
विनायक मेटेंचा अपघात नेमका कसा झाला? फडणवीसांनी पुर्ण घटनाक्रमच सांगीतला
एक व्यवहार झाला अन् छप्परफाड रिटर्न देऊ लागला अदानी ग्रुपचा ‘हा’ खास शेअर; गुंतवणूकदारांच्या उड्या