..नाहीतर पळता भूई थोडी होईल, अमोल मिटकरींचा चंद्रकांत पाटलांवर घणाघात

मुंबई | केंद्र सरकारनं पावसाळी अधिवेशनात कृषी क्षेत्राशी संबंधित तीन विधेयक मंजुर करून घेतली. या विधेयकांचं कायद्यात रुपांतर झालं असून, शेतकऱ्यांकडून त्याला प्रचंड विरोध होताना दिसत आहे. यावरुन महाराष्ट्रात ही राजकारण तापले आहे.

 

यावेळी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर ट्विट निशाणा साधला आहे.  ते म्हणाले, चंद्रकांत पाटील जी शेतकऱ्यांचा उद्रेक होतोय. कृषिविरोधी कायदा रद्द होणार नाही ही मग्रुरीची भाषा आता तरी  बंद करा.

 

अन्नदाता जर रस्त्यावर उतरला असेल तर तुमचा हिटलरशाही कायदाच काय बरंच काही रद्द करावं लागेल. आगीत तेल ओतणं बंद करा. नाहीतर पळता भुई थोडी होईल. अस ते ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

 

 

त्यापूर्वी, शरद पवारांनी केंद्र सरकारला फटकारले होते. शरद पवारांच्या वक्तव्याच चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले असून काहीही झालं तरीही कायदा रद्द होणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

 

मोदी सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून हा कायदा तयार केला आहे. या कायद्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळं काहीही झालं तरीही कायदा रद्द होणार नाही. या कायद्यात बदल केला जाईल, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.