बाॅलीवूडसाठी अजून एक धक्कादायक खबर; संजय दत्तला झाला कॅन्सर

मुंबई | काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेता संजय दत्त लिलावती रुग्णालयात अचानक प्रकृती बिघडल्याने दाखल झाला होता. पण आता संजय दत्तला कॅन्सर असल्याचे निदान झाले आहे.

श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याची कोरोना चाचणीसुद्धा करण्यात आली होती. पण त्याच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.

त्यामुळे दत्त कुटुंबियांना आणि त्याच्या चाहत्यांना दिलासा मिळाला होता. पण आता या बातमीमुळे सर्वाना धक्का बसला आहे. चित्रपट व्यवसायविषयीचे अभ्यासक आणि संपादक संजय नहाटा यांनी याबाबतचं Tweet केलं आहे.

६१ वर्षीय संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर असल्याचे निदान झाले आहे. त्याला पुढील उपचारासाठी अमेरिकेत न्यायचा विचार असल्याचं समजतंय. मी कामापासून काही वेळ ब्रेक घेतोय असं संजय दत्तने ट्विट केलं होतं.

त्याने पुढे असे लिहिले होते की, माझ्या चाहत्यांनी आणि हितचिंतकांनी उगाच अफवा पसरवू नयेत. माझे कुटुंबीय माझ्या बरोबर आहेत आणि काही वैद्यकीय उपचारांसाठी मी ब्रेक घेतोय, असं संजयने काही तासांपूर्वीच जाहीर केलं होतं. तेव्हापासूनच चर्चांना उधाण आलं होतं. पण आता संजय दत्तला काय झालंय याचा उलगडा झाला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.