Shinde Group : राऊतांच्या कारभाराला कंटाळून ठाकरे गटाचा आणखी एक आमदार शिंदे गटात जाणार? पहा नेमकं काय घडलय

Shinde Group : महाराष्ट्रातील राजकारणात सतत नवनवीन घडामोडी घडत आहेत. बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (ठाकरे गट) यांच्यात सतत एकमेकांवर कुरघोडी करण्याची स्पर्धा चालू असते. शिवसेनेत फुट पडून जवळपास 3 महिने झाले आहेत.

शिंदे यांनी शिवसेना पक्षातून बाहेर पडताना आपल्यासोबत 40 आमदारांना नेले. या 40 आमदारांच्याच बळावर एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षासोबत हातमिळवणी करत महाराष्ट्रामध्ये सत्तापरिवर्तन केले. सोबतच एकनाथ शिंदे यांच्याकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद पण आले.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांच्या गटात केवळ 16 आमदार राहिले. सोबतच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी 12 खासदारांना आपल्या गटात सहभागी करून घेतले. सोबतच राज्यभरातील नगरपालिका, महागरपालीकेतील  नगरसेवकांना देखील आपल्या गटात सहभागी करण्याचा झपाटा लावला आहे.

आता मात्र, शिंदे गट ठाकरे गटाला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्राच्या गृहविभागाने ठाकरे गटाचे आमदार असलेल्या राजन साळवी यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. त्यांना वाय प्लस श्रेणीची सुरक्षा प्रधान करण्यात आली आहे.

त्यांच्या या वाढवण्यात आलेल्या सुरक्षेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ते लवकरच ठाकरे गटाला रामराम ठोकून शिंदे गटात सहभागी होऊ शकतात, अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत. विनायक राऊत यांनी कॉंग्रेस पक्षाचे अविनाश लाढ यांची भेट घेतल्यामुळे राजन साळवी नाराज असल्याचे बोले जात होते.

याबाबत राजन साळवी यांना विचारले असता ते म्हणाले, मी उद्धव साहेबांचा एकनिष्ठ आहे. या सर्व अफवा आहेत. या अफवा भारतीय जनता पक्षाकडून पसरवल्या जात आहेत. मला याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही.

महत्वाच्या बातम्या
Nagpur : फडणवीस-बावनकुळेंच्या नागपूरात भाजपला दणका; काॅंग्रेस राष्ट्रवादीने केला सुपडा साफ
Amravati : मोठ्या कंपनीत लाखोंची नोकरी, करोडोंची संपत्ती, सगळ्याचा त्याग करून तरूणाने घेतला संन्यास; म्हणाला, मला स्व पासून.. 
Eknath shinde: राज ठाकरेंनंतर काँग्रेसच्या बड्या नेत्या मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण  
Shivsena : सुसाट भाजपला शिवसेनेचा ब्रेक; फडणवीसांचा ‘हा’ खास नेता ठाकरेंच्या दारी, हाती घेणार शिवबंधन