अंबानींच्या घरासमोरील स्फोटकांनी भरलेल्या कारचा दहशतवादी संघटनेशी संबंध? NIA ने केला मोठा खुलासा

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणारे मुंबई पोलिस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना अखेर NIA कडून अटक करण्यात आली आहे. सचिन वाझे यांना तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर अटक झाली आहे.

दरम्यान, मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली आणि धमकीचे पत्र असलेली स्कॉर्पियो सापडली होती. याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने सचिन वाझे यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे.

वाझे यांच्या अटकेनंतर आता महत्त्वाचे खुलासे होत आहे. या प्रकरणाचा दहशतवाद्यांशी कोणताही संबंध नव्हता आणि टेलिग्रामवर पाठवण्यात आलेला मेसेज हा खोटा होता, असा मोठा खुलासा एनआयएने केला आहे. तसेच ज्या वेळी स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी सापडली होती.

तेव्हा या कारमध्ये सापडलेले धमकीचे पत्र ज्या टेलिग्राम चॅनलवरुन देण्यात आले होते, ते टेलिग्राम चॅनल दिल्लीतील तिहार कारागृहात तयार करण्यात आले होते, अशी माहिती समोर आली होती. मात्र, तपासाअंती हे सर्व खोटे असल्याचे उघड झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

दारात बापाचा मृतदेह असताना मंगलने दिली CA ची परिक्षा, तिच्या जिद्दीपुढं सगळी संकटं हरली

आयुष्याने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले, पण नंतर एका शिक्षकाने तिचे आयुष्य उभारले

विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये पृथ्वी शॉचा झंझावात; ३९ चेंडूत ठोकल्या ७३ धावा 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.