आण्णा नाईक परत येणार…!

मराठीमध्ये आत्तापर्यंत आपण अनेक मालिका पाहील्या आहेत. पण जास्त करुन मालिका सासू सुनेच्या कथेभवती फिरतात. या सर्व मालिकांना मागे सोडत झी वाहिनीने मराठी टेलिव्हिजनवर भीती आणि गुढं असे रहस्य एका नव्या ट्रेंडची सुरुवात केली होती. या मालिकेचे नाव ‘होते रात्रीस खेळ चाले’.

वेगळ्या कथेने आणि रहस्यांनी या मालिकेने खुप कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. मालिकेच्या पहील्या सीजनला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले होते. मालिकेची प्रसिद्धी पाहता मालिकेचा दुसरा सीजन देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

आण्णा नाईक, दत्ता, माधव, पांडू, शेवंता अशा सर्वच पात्रांना प्रेक्षकांनी खुप पसंत केले होते. पहील्या सीजनमध्ये प्रॉपर्टीसाठी भांडण सुरु होते. तर दुसऱ्या सीजनमध्ये मालिकेत वीस वर्षांपूर्वीची कथी दाखवण्यात आली होती. मालिकेच्या दोन्ही सीजनला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले.

त्यामूळे आत्ता लवकरच या मालिकेचा तिसरी सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आण्णा नाईक परत एकदा तुमच्या भेटीला येणार आहेत. झी मराठीने रात्रीस खेळ चाले मालिकेच्या तिसऱ्या सीजनची घोषणा केली आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये अंधारात आण्णा नाईंकाचा चेहरा दिसत आहे. व्हिडीओ शेअर त्यांनी व्हिडीओला आण्णा नाईक परत येणार…लवकरच असे कॅप्शन दिले आहे. मालिकेच्या शुटींगला सुरुवात झाली आहे. मालिकेच्या तिसऱ्या सीजनमध्ये काय पाहायला मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

महत्वाच्या बातम्या –

व्हॅलेंटाईन डे दिवशी जुळल्या रेशीमगाठी; बिग बॉसच्या घरात आणखी एक जोडी जुळली

जाणून घ्या ‘लाडाची मी लेक गं’ मालिकेतील मम्मी म्हणजेच स्मिता तांबेचा अभिनय क्षेत्रातील प्रवास

स्वप्नाली पाटीलने आस्तादसाठी घेतला भन्नाट उखाणा, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

सर्वसामान्यांचा महिन्याचा खर्च वाढणार, घरगुती सिलेंडरच्या भावात मोठी वाढ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.