निलेश लंकेंच्या कामाचे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले कौतुक, म्हणाले…

अहमदनगर | जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचे कौतुक केले आहे. अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धी येथून भ्रमणध्वनीद्वारे निलेश लंके यांनी उभारलेल्या भाळवणी येथील शरदचंद्र पवार कोविड सेंटरमधील रुग्णांशी संवाद साधला आहे. यावेळी ते बोलत होते.

मानवसेवा हीच माधवसेवा आहे, या भावनेतून कोरोना संकटकाळात आमदार निलेश लंके करीत असलेले काम केवळ तालुका, जिल्हा, राज्यासाठी नव्हे तर देशासाठी आदर्शवत, दिशादर्शक असल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. तळागाळातील दीनदुबळ्यांची सेवा करण्यासाठी आमदार निलेश लंके यांना दीर्घायुष्य लाभावे अशा भावनिक शुभेच्छा अण्णा हजारे यांनी दिल्या आहेत.

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रुग्णांशी संवाद साधत त्यांना धीर दिला आहे. यावेळी अण्णा हजारे म्हणाले देशात अनेक आमदार आहेत मात्र लंके यांच्यासारख्या सर्वसामान्यांच्या सेवेसाठी २४ तास वाहून घेणारा लोकप्रतिनिधी विरळच. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून आमदार निलेश लंके यांचे काम अव्याहतपणे सुरू आहे.

भाळवणी येथील उपचार केंद्रात दाखल झालेला रुग्ण तेथील आनंदी वातावरणाचा अनुभव घेतल्यानंतर आपण आजारी आहोत, आपणास कोरोना संसर्गाची बाधा झाली असल्याचे विसरतो. असे अण्णा हजारे म्हणाले आहेत.

तसेच निलेश लंके ज्या वेळी आमदार नव्हते, त्या वेळीही जनसामान्यांसाठी ते अहोरात्र झटत असत हे आपण अनुभवले आहे. आमदार लंके कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता करत असलेल्या निष्काम सेवेमुळे त्यांच्या विषयी आदर वाढत आहे. असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

कोरोना उपचार केंद्रातील आनंदी वातावरणामुळे रुग्ण बरा होण्यास मोठा हातभार लागतो. किंबहुना तेथील वातावरणामुळे रुग्ण अपेक्षेपेक्षा कमी वेळेत बरा होतो. सध्याच्या वातावरणात आमदार निलेश लंके रुग्णसेवेचे काम मोठे असल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! आयपीएल पुन्हा होणार, वर्ल्डकपबाबत लवकर निर्णय, बीसीसीआयची मोठी घोषणा
भाजप कार्यकर्त्याला केलेली मारहाण पोलिसांना भोवली, जालण्यात PSI सह ५ पोलिसांचे निलंबन
मोठी बातमी! भाजपला रामराम ठोकून संभाजीराजे मराठा आरक्षणासाठी नवीन पक्ष स्थापन करणार?

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.