Solapur : बुधवारी मध्यरात्री लातूरहून (Latur) सोलापूरकडे जाणाऱ्या लातूर-सोलापूर हायवेवर (Latur-Solapur Highway) भयंकर घटना घडली. भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या (Anti-Corruption Struggle Committee) कार्यकर्त्यांवर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. यामध्ये ३७ वर्षीय अनमोल केवटे (Anmol Kevate, रा. मंद्रूप, दक्षिण सोलापूर) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची मैत्रीण सोनाली भोसले-सुपेकर (Sonali Bhosale Supekar, रा. अंत्रोळी, दक्षिण सोलापूर) गंभीर जखमी झाली.
हल्लेखोरांनी अनमोलच्या गळ्यावर आणि मानेवर सपासप वार केले तर सोनालीच्या छातीत तीन आणि पाठीवर दोन वेळा चाकूने वार केले. अनमोल रक्तरंजित अवस्थेत कोसळला, त्याला रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. सोनालीवर सध्या सोलापूरच्या रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.
कारमधील वाद व हल्ल्याची कारणे
माहितीनुसार, अनमोल आणि सोनाली भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या बैठकीसाठी लातूरला गेले होते. परत सोलापूरकडे जाताना त्यांच्या कारचा कट झाला. या कारमधील वादातून अनमोल व गाडी चालक नवनाथ लक्ष्मण धाकपाडे (Navnath Laxman Dhakpade, खडकगल्ली, बाळे) यांच्यात तणाव वाढला. नंतर जीप गाडीने कार ओव्हरटेक केली, यातून वाद आणखी तीव्र झाला.
दोन्ही गाडीमधील व्यक्तींमध्ये भांडण व शिवीगाळ सुरु झाली. त्यावेळी दुसरा हल्लेखोर उतरला आणि अनमोलच्या गळ्यात व मानेवर चाकूने वार केले. सोनालीही झटापटीत पडली, तिच्या छातीत तीन आणि पाठीवर दोन वेळा चाकू भोसकण्यात आला. हल्ला करून आरोपी तात्काळ पसार झाले.
पोलिसांची कार्यवाही
एमआयडीसी पोलिस ठाण्यात (MIDC Police Station) अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून बीएनएस ३६७/२५ कलम १०३(१), १०९(१), १२६(२), ३५२, ३(५) अंतर्गत कारवाई सुरू आहे. सध्या पोलिस तपास करत आहेत. परिसरात भीतीचे वातावरण असून नागरिकांनी शांती राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.