अभिनेता अंकूश चौधरीची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री; पहा फोटो

मराठी फिल्म इंडस्ट्रीतील दिलदार डॅशिंग अभिनेता म्हणून अंकूश चौधरीला ओळखले जाते. तो त्याच्या प्रत्येक चित्रपटातून प्रेक्षकांसाठी नवीन काही तरी घेऊन येत असत. महाराष्ट्रासोबतच महाराष्ट्राच्या बाहेर देखील दोघांचे लाखो चाहते आहेत. खास करुन मुलींमध्ये त्याचा वेगळा चाहता वर्ग आहे.

लाखो मुलींच्या मनावर राज्य करणारा अंकूश खऱ्या आयूष्यात विवाहीत आहे. त्याने २००७ मध्ये दिपा परबसोबत लग्न केले. दोघांचे लग्न लव्ह मॅरेज आहे. तब्बल दहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

अकूंश चौधरीची पत्नी दिपा मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. लग्नानंतर दिपाने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला. एवढ्या वर्षांनतर दिपा आत्ता परत एकदा अभिनय क्षेत्रात कमबॅक करणार आहे. पण या वेळेस ती टेलिव्हिजनवर कमबॅक करणार आहे.

दिपाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर याबद्दल माहीती दिली आहे. तिच्या या निर्णयाने तिचे चाहते खुप आनंदी झाले आहेत. दिपा स्टार प्रवाहवरील शौर्य और अनोखी की कहानी या मालिकेत दिसणार आहे. तिने या अगोदरही अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.

दिपाच्या या निर्णयाने अंकूश देखील खुप आनंदी आहे. दोघांना प्रिन्स नावाचा मुलगा आहे. अंकूश आणि दिपी लव्ह स्टोरी देखील खुपच रंजक आहे. कॉलेजमध्ये दोघांची पहीली भेट झाली होती. तेव्हा त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केले. त्यांची मैत्री खुप घट्ट झाली होती.

मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पण त्यांनी लग्नाची घाई केली नाही. पहीले त्यांनी करिअरवर लक्ष दिले. करिअरमध्ये यशस्वी झाल्यानंतरच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघेही कामावर लक्ष देत होते. अनेक वर्ष त्यांनी इंडस्ट्रीमध्ये मेहनत केली.

दिपाने तिच्या करिअरमध्ये चकवा, क्षण, कथा तिच्या लग्नाची अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले. त्यासोबतच हिंदीमध्ये छोटी मॉं, थोडी खुशी थोडा गम, रेत अशा मालिकांमध्ये काम केले. दिपाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती.

तर दुसरीकडे अंकूशने दुनियादारी, क्लासमेट्स, दुनियादारी, डबल सीट, दगडी चाळ, गुरु, देवा अशा हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. करिअरमध्ये चांगले यश मिळाल्यानंतर २००७ साली त्यांनी लग्न केले. लग्नाच्या एवढ्या वर्षांनंतरही दोघांचा संसार सुखाचा सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या

आजकाल कुठे गायब आहे ‘जोश’ चित्रपटातील खलनायक; वाचा त्याचा खडतर प्रवास

बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात पागल होते राजकूमार; पण तिने मात्र लग्नाला दिला होता नकार

सलमानसोबत ब्रेकअप करणे ऐश्वर्याला पडले होते चांगलेच महागात; करिअर झाले होते खराब

‘आपके प्यार मैं’ गाण्यात हॉटनेसने आग लावणारी अभिनेत्री मालिनी शर्मा आज करते ‘हे’ काम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.