अंकीता सुशांतची फक्त गर्लफ्रेंड नव्हती, तर तिने त्याच्या आईची जागा घेतली होती

 

मुंबई। सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांच्या कॉमन फ्रेंड संदीपने सुशांत आणि अंकिताच्या नात्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. एका इंटरटेनमेंट वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये संदीपने म्हंटले होते की, “अंकिता फक्त सुशांतची गर्लफ्रेंड नव्हती तर तिने त्याच्या आईची जागा घेतली होती.

मी २० वर्षाच्या माझ्या करियरमध्ये कधी तिच्यासारखी मुलगी पहिली नाही. ती सुशांतची जितकी काळजी घेत होती तितकी कोणी घेत नव्हतं. फक्त तीच त्याला वाचवू शकत होती. ती सुशांतच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेत होती.

अंकिता सुशांतच्या आवडीचे जेवण देखील बनवत होती. मी प्रार्थना करतो कि प्रत्येकाला अंकितासारखी मुलगी मिळो. ती सुशांतसाठी आपले करियर देखील सोडायला तयार होती. तिला चित्रपटांच्या ऑफर देखील मिळू लागल्या होत्या.

ब्रेकअप नंतर ती सुशांतचे चित्रपट यशस्वी होण्याची प्रार्थना देखील करत होती. जेव्हा सुशांतने हे पाऊल उचलले आणि जेव्हा मी त्याला पाहिले तेव्हा मला सर्वात जास्त चिंता अंकिताची वाटत होती. मी सतत अंकिताला फोन करत राहिलो.

पण तिने माझा फोन उचलला नाही. मला माहिती होतं कि ती कोणत्या परिस्थितीमधून जात होती. मी तिला १० वर्षांपासून ओळखतो. मला वाटते कि त्या दिवशी त्याने मला ज्याप्रकारे मिठी मारली तशी मिठी कधीच मारली नव्हती”.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.