अरे देवा देवा.. कोरोना लस घेताच अभिनेत्री अंकिता लोखंडेची नाटकं सुरू; पहा व्हिडिओ

अभिनेत्री अंकीता लोखंडे ही सोशल मीडियावर खुप ऍक्टिव्ह असते. तसेच ती आपले नवनवीन व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करुन चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते. आताही तिने एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी आता देशभरात लसीकरण सुरु करण्यात आलेले आहे. त्यामुळे अंकिता ही लस घेण्यासाठी गेली होती. आता तिने लस घेतानाच व्हिडिओ इन्स्टाग्रामवर टाकला आहे. या व्हिडिओमध्ये ती खुप घाबरलेली दिसून येत आहे.

अंकिताने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तसेच तिने यावेळी लस घेण्याचे आवाहनही लोकांना केले आहे. पण यावेळी लस घेताना ती स्वत:च घाबरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे.

व्हिडिओमध्ये लसीकरण केंद्रावरील नर्सेस अंकिताला काही सुचना देत आहे. मात्र ती लस बघून खुप घाबरत असल्याची दिसत आहे. लस बघून अरे देवा.. देवा… असे अंकिता लोखंडे म्हणत आहे. तिथल्या नर्सेस तिला धीर देत आहे.

अंकिताच्या हाताला सुई लागताच तिने स्वामींच्या नावाचा जप सुरु केला आहे. नर्सने सुई हळू टोचेल असे सांगितले तरीही अंकीताची भिती तशीच असून ती स्वामींचे नाव घेताना दिसून येत आहे. लस घेतल्यानंतर मात्र ती हसायला लागली आहे.

हा व्हिडिओ पोस्ट करत अंकीताने चाहत्यांना लस घेण्याचे आवाहन केले आहे. मी माझी लस घेतली आहे, तुम्ही पण तुमची लस लवकरात लवकर घ्या, असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. अंकिताचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून अनेक मजेदार कमेंट या व्हिडिओला आल्या आहे.

महत्वाच्या बातम्या-

वा रे पठ्ठ्या! शेतकऱ्याने बांध कोरून चक्क आपल्या देशाचे क्षेत्रफळच वाढवले
ना रेमडीसीवीर, ना व्हेंटीलेटर तरीही २९ हजार रूग्णांना बरे करणाऱ्या डाॅक्टरवर गुन्हा दाखल
VIDEO: हिंदूस्थानी भाऊला पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.