‘दुनियेचं मला घेणदेणं नाही’ म्हणत अंकिता लोखंडेनं केली लग्नाची घोषणा; या पद्धतीने करणार लग्न

मुंबई | सुशांत सिंग राजपूतची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अकिंता लोखंडे पुन्हा चर्चेत आली आहे. अंकिता लवकरच विकी जैन या उद्योजकाशी विवाह करणार असल्याचे तिने स्पष्ट केले आहे. अंकिताने स्वत:च एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.

अंकिता नेहमीच उद्योजक विकी जैनसोबतचे रोमँटिक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अंकिता आणि विकी गेल्या  तीन वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. आता त्यांनी विवाह करणार असल्याचा निर्णय घेतला आहे.

सुशांत आणि अंकिता तब्बल ६ वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. ते लग्नही करणार होते. मात्र अचानक २०१६ मध्ये त्यांच ब्रेकअप झालं. त्यानंतर काही काळ अंकिता सिंगल होती. त्यावेळी ती खूप मानसिक तणावातून गेली असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर अंकिताच्या आयुष्यात मुंबईतील उद्योजक विकी जैन आला. अंकिता त्याला डेट करू लागली.

अंकिता आणि विकीच्या नात्याला आता काही वर्षे उलटली आहेत. दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार अंकिताने एका मुलाखतीत सांगितले आहे की, ‘मला एका प्रेमाची गरज आहे. जसे जेवण गरजेचे आहे तसे माझ्या जीवनात प्रेमाची गरज आहे’.

विकीसोबतच्या आपल्या नात्याविषयी बोलताना अंकिता म्हणाली, “मी कुठेही जाऊ, काम करू मला माझा पार्टनर माझ्या सोबत पाहिजे, बाकी दुनियेशी मला घेणदेणं नाही. माझ्या प्रियकरासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी मौल्यवान आहे.”

अंकिताने सांगितले की ते डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. ती म्हणाली माझे लग्न जोधपूर किंवा जयपूरमध्ये होणार आहे. अजून काहीच ठरलं नाही. पण मला राजस्थानी पद्धतीने लग्न करायचं आहे. यावेळी बोलताना अंकिताने सुशांतचाही उल्लेख केला. ती म्हणाली “सुशांत माझा आवडता अभिनेता आहे. पवित्र रिश्ता मध्ये आम्ही सोबत काम केलं आहे”.

महत्वाच्या बातम्या-
इंडिअन आयडल १२ वादाच्या भोवऱ्यात, ड्रामेबाजी करून मिळवली टीआरपी; शेवटी सगळं काही उघड झालं
..त्यावेळी सचिन जेव्हापण मान डोलवायचा भजी त्याच्यासमोर येऊन उभा राहायचा, वाचा भन्नाट किस्सा
एलआयसीमध्ये काम करणारी मुलगी कशी झाली ठाकरे घराण्याची सुन? वाचा भन्नाट लव्हस्टोरी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.