अंकिता लोखंडेने सांगितला कास्टिंग काऊचचा अनूभव; म्हणाली, रूममध्ये नेऊन…

फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. खास करून अभिनेत्रींना. त्यांना वेगवेगळ्या गोष्टींना सामोरे जावे लागते. एवढेच नाही तर त्यांना कास्टिंग काऊचसारख्या गोष्टीचा देखील सामना करावा लागतो.

फिल्म इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींनी आजपर्यंत कास्टिंग काऊचचे अनुभव सांगितले आहेत. तर अनेकांना या गोष्टी विरोधात आवाज उठवला आहे. बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींना याचा सामना करावा लागला होता.

फिल्म आणि टेलिव्हिजन अभिनेत्री अंकिता लोखंडेने एका मुलाखतीमध्ये तिच्या कास्टिंग काऊचच्या अनूभवाबद्दल सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी तिने एका मुलाखतीत हा धक्कादायक प्रकार उघड केला आहे.

अंकिताने सांगितले की, करिअरच्या सुरुवातीला ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये नवीन होती. त्यावेळी तिला खुप मेहनत करावी लागली होती. याच कालावधीमध्ये तिला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता.

ती म्हणाली की, ‘मी एका साऊथ चित्रपटाच्या ऑडिशनसाठी गेले होते. त्यावेळी चित्रपटाच्या निर्मात्याने मला एका रुममध्ये बोलवले आणि प्रश्न विचारायला सुरुवात केली. थोड्याच वेळात त्याने मला तुला कॉम्प्रेमाईझ करावे लागेल. तु तयार आहेस ना? असा प्रश्न केला’.

‘हा प्रश्न ऐकल्यानंतर सुरुवातीला मला धक्का बसला. पण त्यानंतर मात्र मी शांत न बसला त्याला सडेतोड उत्तर दिले. मी म्हणाले की, तुम्हाला चित्रपटासाठी हुशार अभिनेत्री नाही तर झोपण्यासाठी मुलगी हवी आहे. हे ऐकल्यानंतर त्यांनी माझी माफी मागितली आणि मला चित्रपटात काम दिले. पण त्यावेळी मी चित्रपटाला नकार दिला’.

अंकिता लोखंडे इंडियन टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध नाव आहे. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून तिला घराघरात ओळख निर्माण झाली होती. त्यानंतर अंकिता सुशांत सिंग राजपूतमूळे चर्चेत आली होती. दोघे अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यामुळे सुशांतच्या मृत्यूनंतर ती चर्चेत आली होती.

महत्त्वाच्या बातम्या –

उलट उत्तर देणाऱ्या मिथून चक्रवर्तीचा राजकुमारने असा अपमान केला की, त्यांनी रडायला केली होती सुरुवात

प्रेग्नेंट हेमा मालिनीला अमिताभ बच्चनने दिली होती ‘अशी’ ऑफर की धर्मेंद्रचा राग झाला अनावर

सैफची बहीन सोहाच्या ‘त्या’ एका ‘सीडी’ने पटौदी कुटूंबाचे नाक कापले होते; सैफने रातोरात गायब केली होती

निवेदिता सराफ गेल्या ११ वर्षांपासून करत आहेत साईड बिझनेस, या मोठ्या ब्रॅंडच्या आहेत मालकीण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.