मी नाही सुशांतनेच मला सोडलं, अंकिता लोखंडेने केला सुशांतसोबतच्या ब्रेकअपबद्दल खुलासा

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपुतच्या आत्महत्येनंतर संपुर्ण बॉलिवूडला मोठा धक्का बसला होता. सुशांतच्या आत्महत्येला ९ महिने झाले आहेत. तरीही सुशांतच्या अचानक जाण्याच्या धक्क्यातून त्याचं कुटूंब, मित्र परिवार, फॅन्स आजूनही सावरलेले नाहीत.

सुशांतने आत्महत्या केल्यानंतर त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री अंकिता लोखंडेला सर्वात जास्त धक्का बसला होता. कारण सुशांत आणि अंकिता ६ वर्ष रिलेशनमध्ये होते. त्यानंतर दोघांमध्ये ब्रेकअप झाला होता.

सुशांतच्या आत्महत्येनंतर सुशांतच्या चाहत्यांनी अंकिताला ट्रोल करण्यास सुरूवात केले होते. त्यामूळे अंकिता खचून गेली होती. अंकिताने एका मुलाखतीत बोलत असताना दोघांच्या ब्रेकअपबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

सुशांतसोबत ब्रेकअप केल्यानंतर मला धक्का बसला होता. यातून सावरण्यासाठी मला अडीच वर्ष लागली. सुशांतला करिअरमध्ये पुढे जायचे होते. त्यामुळे त्याने माझ्याऐवजी त्याचे करिअर निवडले. अन् तो पुढे निघून गेला.

मी त्याची खुप वाट पाहिली. पण सुशांत परतला नाही. मी त्याला दोष देत नाही. त्याने त्याचा मार्ग निवडला. सुशांतने ब्रेकअप केल्यानंतर मी त्याच्या कुटूंबाशी नाते टिकवून ठेवले होते आणि आजही आहे.

अंकिता पुढे म्हणाली, सुशांतसोबत लग्न करण्यासाठी मी सुल्तान, बाजीराव, मस्तानी, हॅपी न्यू इयर, राम लीला, बदलापुर यांसारख्या मोठ्या चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या होत्या. माझ्यापेक्षा सुशांतच चांगल होऊ दे असं मला वाटायचं. सुशांतच्या पाठिशी मला खंबीरपणे उभं राहायचं होतं.

सुशांतला नेहमी पुढे जाण्याची इच्छा होती. त्याने त्याचा मार्ग निवडला. त्याच्यासाठी मी कोठे चुकीचे सिध्द होते? मला शिव्या शाप का दिला जातो? मी काय चुक केली आहे? जर माझ्याबद्दल माहित नसेल तर मला दोष देणे थांबवा, असं अंकिता लोखंडेने म्हटलं आहे.

दरम्यान २००९ साली पडद्यावर आलेल्या पवित्र रिश्ता या मालिकेतून सुशांतने मानवची भूमिका, तर अंकिताने अर्चनाची भूमिका निभावली होती. या मालिकेतूनच त्यांच्या जोडीने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते.
महत्वाच्या बामम्या-
….म्हणून अमिताभ बच्चनचे पाय पकडून रडत होती करिना कपूर
७० च्या दशकामध्ये ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीसोबत शशी कपूरने दिला होता पहीला न्यूड सीन
ज्याने शुन्यातून स्टार बनवले; त्याला शेवटच्या दिवसांमध्ये भेटलेही नाहीत अमिताभ बच्चन

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.