अंकिता लोखंडेचा भन्नाट डान्स व्हिडीओ व्हायरल; सुशांतच्या फॅन्संनी केलं ट्रोल

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण बॉलीवूडला धक्का बसला आहे. वांद्राच्या घरामध्ये सुशांतसिंग राजपूतने गळफास लावून आत्महत्या केली. सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलीवूडमधील अनेकांना मोठा धक्का बसला.

अशातच अभिनेत्री अंकिता लोखंडे ही प्रचंड दु:खी होती. सुशांतच्या आत्महत्येची बातमी कळताच अभिनेत्री अंकिता लोखंडेलाही धक्का बसला. नुकताच तिने एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. या नव्या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे. काळ्या रंगाच्या पोलकाडॉट स्कर्ट आणि टॉपमध्ये अंकिता बिनधआस्त डान्स करतेय.

या व्हिडीओला अंकिताने खास कॅप्शनने दिलं आहे. ती म्हणतीये, ‘ज्या व्यक्ती डान्स करतात त्या स्वाभिमानी असून आयुष्याकडे त्या सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतात.’ तिच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. सुशांतच्या चाहत्यांनी तिला ट्रोल केले आहे.

दरम्यान, सुशांतच्या चाहत्यांनी अंकिताला ट्रोल करताना ‘मिस यू सुशांत’ अशा कमेंट दिल्या आहेत. तर ‘वेडी झालीय का? असं म्हणत काहींनी अंकिताला ट्रोल केले आहे. काहींनी अंकिताला ही डान्स स्टाईल शोभत नसल्याचं म्हंटले आहे. यापूर्वीही अनेकदा अंकिता ट्रोल झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
‘मोदी सरकारने डिझेलच्या करातून २१ लाख कोटी कमावले’
राहुल वैद्यला मागे टाकत रुबीना दिलैक ठरली बिग बॉस १४ची चॅम्पियन…
पूजा चव्हाण आत्मह.त्या! पूजाच्या वडिलांनी ‘हे’ सांगताच तृप्ती देसाईं जोडले हात अन्…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.