‘तुझ्यामुळे मुस्लीम स्त्रियांचं नाव खराब होतं’, अंजुम फकीहच्या बिकिनी लूकवर नेटकरी भडकले

‘कुंडली भाग्य’ आणि ‘कुमकुम भाग्य’ या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये झळकलेल्या अभिनेत्री अंजुम फकीहने नुकतेच सोशल मीडियावर बिकिनी मधील तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमुळे तिला तुफान ट्रोल केलं जात आहे. मालिकेत सोज्वळ पण खऱ्या आयुष्यात फार शेफारलेली दिसतेस अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

कुंडली भाग्य या मालिकेतून अंजुम फकीह घराघरात पोहचली आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते. या मालिकेसोबत आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळं ती कायम चर्चेत असते.

आपल्या चाहत्यांसाठी अंजुम सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असल्याची पाहायला मिळते. तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. मात्र पडद्यावर सोज्वळ भूमिका साकारणाऱ्या अंजुमने यावेळी शेअर केलेले फोटो पाहून नेटकरी संतापले आहेत.

अंजुम फकीहने बिकीनीतील तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. यानंतर ती चांगलीच ट्रोल झाल्याचे पाहायला मिळत आहे. चाहत्यांना अंजुमचा हा बिकिनी लूकमधील बोल्ड स्टाईलीश अंदाज पसंत पडला आहे. मात्र अंजुमचा बिकिनी अवतार पाहून काही मुस्लीम नेटकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत.

अंजुम फकीह मुसलमान असल्याची कल्पना देत तू असे कपडे न घालण्याची सूचना करत नेटकरी कमेंट्स करत आहेत. काही युझर्स अंजुम फकीहबाबत बोलताना सर्व मर्यादा ओलांडताना दिसत आहेत. तिच्यासाठी अश्लील शब्द देखील वापरले आहेत.

अंजुमच्या पोस्टवर एकाने लिहिले आहे ‘अंजुम अल्लाहसाठी असे कपडे घालू नको. तु मुसलमान आहेस मग तू असा ड्रेस का घालते? ‘ दुसर्‍या एकाने लिहिले, ‘हे काय आहे? एक मुस्लीम म्हणून आपण असे कपडे कसे घालू शकतो? तसेच आणखी एकाने लिहिले आहे, ‘पडदा हा माणसाचे सौंदर्य आहे आणि तु तर मुस्लीम आहे. काहीही झाले तरी इस्लामची काळजी घेतली पाहिजे.’

दरम्यान, काही महिन्यांपुर्वी केलेल्या इंन्स्टाग्राम लाईव्ह चॅटमध्ये अंजुमनं आपल्या ट्रोलर्सला एक सल्ला दिला होता. ती म्हणाली जर तुम्हाला माझे फोटो आवडत नसतील तर त्याकडे दुर्लक्ष करा. तुमच्या कमेंट्सचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही. यावेळी देखील तिनं अशाच प्रकारे ट्रोल करणाऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे. तर स्तुती करणाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

महत्वाच्या बातम्या-
‘पा’ चित्रपटातील ही अभिनेत्री माहितेय.? म्हणाली होती ही शेवटची भेट, अपघातात झाला मृत्यू…
…म्हणून मीनाषी शेषाद्रीने ‘दामिनी’ चित्रपटानंतर एकही चित्रपट साईन केला नाही
शाहीद अफरीदीची सुंदर मुलगी अडकणार लग्नबेडीत, या प्रसिद्ध क्रिकेटरसोबत ठरले लग्न

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.