भाजपची झाली नाचक्की; भाजपचे आयटी सेल प्रमुखांचे ट्विट फेक

नव्या तिन्ही कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यातच भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी आंदोलनात शेतकऱ्यांना मारणं तर सोडा, पण लाठीचा स्पर्शही झाला नसल्याचा दावा करणारं ट्विट करण्यात आलं.

यात एक व्हिडीओ जोडण्यात आला होता. हे ट्विट खोटा दावा करत असून चुकीची माहिती पसरवत असल्याचं ट्विटरकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यासाठीच मालवीय यांचे ट्विट ‘फेक न्यूज’ म्हणून प्लॅग झाले आहे. यामुळे भाजपची चांगलीच नाचक्की झाली आहे.

मालवीय यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत एक ट्वीट संदेश जारी केला होता. मालवीय यांनी हा संदेश काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पोलिसी अत्याचाराबाबत टाकलेल्या ट्वीट संदेशाला उत्तर म्हणून टाकला होता. त्यात मालवीय यांनी या शेतकऱ्यांना मारहाण केली जात नसून केवळ दम दिला जात असल्याचे म्हटले होते. मंगळवारी ट्विटरने मालवीय यांचा हा संदेश ‘माध्यमी फेरफार’ असल्याचे म्हटले आहे.

ट्विटर ही समाजमाध्यम कंपनी कुठलेही छायाचित्र, ध्वनिफीत, चित्रफीत जर बनावट, दिशाभूल करणारी असेल तर त्याचे वर्गीकरण ‘माध्यमी फेरफार’ या गटात करीत असते. यापूर्वी ट्विटरने या वर्गवारीचा वापर अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीवेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनेक ट्वीट संदेशांबाबत केला होता.

आता फक्त १२१ रुपये भरा आणि मुलीच्या लग्नाला मिळवा २७ लाख रुपये, जाणून घ्या..

अमिताभ बच्चनने केली त्यांच्या २८०० कोटी रुपयांच्या संपत्तीच्या वारसदाराची घोषणा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.