“देवेंद्र फडणवीस अत्यंत अहंकारी आणि लबाड! माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांची जथ्थी!”

मुंबई : पोलीस महासंचालक परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे देखील कमालीचे आक्रमक झालेत.

मात्र आता खुद्द फडणवीसांवरच गंभीर आरोप झाले आहेत. एकेकाळचे भाजपवासी आणि नंतर राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेले धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी परिपत्रक काढून त्यामध्ये थेट फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

‘फडणवीसांच्या आक्रस्ताळेपणाकडे दुर्लक्ष करा. सत्ता हिरावल्यापासून त्यांचे मानसिक संतुलन ढळत चालले आहे. फडणवीस सरकारमधील मंत्री हे चिंचोके गोळा खात होते का? फडणवीस हे अत्यंत अहंकारी, लबाड आणि दगलबाज आहे, अशी टीका गोटे यांनी केली आहे.

दरम्यान, ‘फडणवीसांना मी स्वत: कुठल्या मंत्र्यांनी कुठल्या आयुक्तांच्या मदतीने पैसे गोळा केले, किती नंबरच्या गाडीतून पैसे कुठे आले, कुणाकडे उतरवले याची विस्तृत माहिती दिली. सदर मंत्र्यांवर कारवाई करण्याऐवजी फडणवीसांनी त्यांना क्लीनचिट दिली, असे गोटे म्हणाले.

‘पोलीस यंत्रणेचा वापर करून विरोधकांनाच नव्हे, तर मासबेस असलेल्या ओबीसी नेत्यांना संपवण्यासाठी फडणवीसांनी पोलीस यंत्रणेला कसं वेठीला धरलं, अशा असंख्य प्रकरणांची माझ्याकडे जथ्थी आहे, असा दावा अनिल गोटे यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

मर्डर चित्रपट पाहिल्यानंतर इम्रान हाश्मीच्या पत्नीने दिली होती ‘ही’ धक्कादायक प्रतिक्रिया

अमृता फडणवीसांनी भाई जगतापांना थेट पुराव्यासहीत खडसावलं..

अमृता खानविलकरचा कातिलाना अंदाज; फोटो सोशल मिडीयावर झाल्या व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.