Anil Deshmukh : काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडी प्रकरणात जामीन मिळाल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, आता सीबीआय न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला आहे.
अनिल देशमुख यांना २ नोव्हेंबरला कथित मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते आर्थर रोड कारागृहात होते. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. कोर्टाने त्यांचा हा अर्ज मंजूरही केला होता.
ईडी आणि सीबीआय असे दोन गुन्हे देशमुखांवर दाखल आहेत. जोपर्यंत त्यांना या दोन्ही गुन्ह्यांमध्ये जामीन मिळत नाही तोपर्यंत ते तुरुंगातच राहतील असे सांगण्यात आले होते. दरम्यान, आता त्यांना ईडी प्रकरणात दिलासा मिळाला असला तरी सीबीआय न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
यावेळी अनिल देशमुख यांच्यावतीने ॲड. विक्रम चौधरी यांनी तर सीबीआयच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी युक्तिवाद केला. त्यांनतर विशेष सीबीआय न्यायाधीश एच. एस. ग्वालानी यांनी याप्रकरणी निर्णय देत अनिल देशमुखांचा अर्ज फेटाळला आहे.
त्यामुळे सध्यातरी त्यांचा मुक्काम तुरुंगातच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच त्यांची यावर्षीची दिवाळी कोर्टातच साजरी होणार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. अनिल देशमुख हे हृदयविकाराचे रुग्ण असून मुंबईतील जसलोक रुगणालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत
ईडी प्रकरणात दिलासा मिळाल्याने यावर्षी अनिल देशुखांची दिवाळी त्यांच्या घरी साजरी होईल, असे त्यांच्या कुटुंबीयांना वाटत होते. परंतु, आता सीबीआय न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने देशमुख कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ठाकरे गट : शेवट शिवसैनिकांनी बदला सूचनाच; बंदखोरांना गावागावात घेरलं अन् पडलं तोंडघशी
कोल्हापूर : …मग तेव्हा भाजपने भाजपची संस्कृती जपली नाही’; कोपुरची वाघीन कडाडली
तेलंगणा: चेकपोस्टवर भाजपा नेत्याच्या कारल्हा बहुमताने नोटांची रास; विचारणा केली…






