गृहमंत्री अनिल देशमुखांनी लिहिलं थेट मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

मुंबई : पोलीस महासंचालक परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे देखील कमालीचे आक्रमक झालेत.

तर दुसरीकडे देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे, या पत्रात म्हटलंय की, ‘माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना १७ मार्च रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवल्यानंतर त्यांनी माझ्यावर जे आरोप केलेत, त्या आरोपामध्ये काहीही सत्यता नाही.

त्यामुळे त्यांनी जे आरोप लावले आहेत, या संपूर्ण प्रकरणाची त्वरीत चौकशी करून दुधका दुध, पानीका पानी करावं अशी मागणी गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर त्यांची बाजू मांडली. माझ्याकडून कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. मी निर्दोष आहे. माझ्यावरील आरोप धादांत खोटे आहेत, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांबद्दल काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली. अधिकाऱ्यांना ओळखण्यात आपण कमी पडतोय का? त्यांच्यावर विश्वास ठेवायचा कसा? अधिकारी फोन टॅप करणार असतील, तर मग मंत्र्यांनी कामं कशी करायची? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

वाचा काय म्हंटलं आहे पत्रात…
मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, “दूध का दूध, पानी का पानी” करावे अशी मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन.

सत्यमेव जयते! परमबीर सिंह द्वारा मुझपर लगाए गए आरापों की जांच करवाकर “दूध का दूध, पानी का पानी” करने कि मांग मैंने माननीय मुख्यमंत्री महोदय से करी थी। अगर वे जांच के आदेश देते हैं तो मै उसका स्वागत करूंगा।

महत्त्वाच्या बातम्या 

“केरळमधील लोक सुशिक्षित आहेत, म्हणून भाजपला मतदान करत नाहीत” भाजप आमदाराचे धक्कादायक वक्तव्य

“देवेंद्र फडणवीस आता कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत”

आदिवासी महिला बनली अनोख्या बॅंकेची चालक-मालक; पद्मश्री देऊन सरकारनेही केला सन्मान

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.