देशा पाठोपाठ महाराष्ट्रातही ई पास रद्द करण्याबाबत गृहमंत्र्यांनी केली महत्वाची घोषणा

मुंबई | करोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता आणली जात आहे. त्याचाच भाग म्हणून आता केंद्र सरकारने देशभरात कुठेही सामान आणि प्रवाशी वाहतुकीसाठी ई-पासची गरज लागणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

वस्तू आणि लोकांच्या आंतरराज्यीय आणि राज्यातंर्गत हालचालींवरील सर्व निर्बंध काढून टाकले आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे ट्विट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अलीकडील मार्गदर्शक सूचनांची आम्ही दखल घेतली असल्याचेही अनिल देशमुख म्हणाले आहेत.

यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने वाहतुकीवरील निर्बंध कमी केले आहेत.

मात्र, प्रत्येक राज्यात त्या त्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीनुसार नियमांमध्ये बदल होत आहेत. काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्बंधांमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही समोर आले. त्यामुळेच केंद्र सरकारने नव्याने हे निर्देश जारी केले आहेत.

 

महत्वाच्या बातम्या :

-७३ दिवसात नाही! सीरम इन्स्टिट्यूटने सांगितले ‘या’ दिवशी येणार कोरोना लस

-लढा कोरोना विरुद्ध ! कोरोनावरील लस कधी येणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितली वेळ

-‘दाऊदला कोणत्याही परिस्थितीत भारतात आणा’, रोहित पवारांनी मोदींकडे केली मागणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.