अखेर विकेट पडलीच! अनिल देशमुखांनी दिला गृहमंत्रीपदाचा राजीनामा; ‘या’ कारणामुळे राजीनामा दिला

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड घडली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. हायकोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर अवघ्या काही तासांत गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. विरोधी पक्षांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

याप्रकरणी बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे की राजीनामा देण्याचा निर्णय अनिल देशमुख यांनी स्वताच घेतला आहे. नैतीकतेच्या आधारावर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सीबीआय चौकशी सुरू असताना गृहमंत्री पदावर राहणे त्यांना योग्य वाटत नव्हते असे नवाब मलिक यांनी सांगीतले.

दरम्यान मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांच्या चौकशीसाठी परमबीरसिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत.

हा निर्णय अनिल देशमुखांना मोठा झटका मानला जातोय. १५ दिवसांत सीबीआयने ही चौकशी पुर्ण करावी असे आदेश कोर्टाने दिले आहेत. अनिल देशमुखांनी दर महीन्याला १०० कोटी रूपयांच्या वसूलीचे टार्गेट पोलीसांना दिले होते असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी केला होता.

त्यांच्या याचिकेतील मुद्दे मान्य करत अखेर हायकोर्टाने अनिल देशमुखांवरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. १५ दिवसांत चौकशी पुर्ण करून याप्रकरणाचा योग्य निर्णय सीबीआय संचालकांना घ्यायचा आहे.

ह्या चौकशीनंतर अनेक घडामोडी व गौप्यस्फोट बाहेर येण्याची शक्यता आहे. आजपर्यंत अनिल देशमुखांच्या चौकशीला नकार देणारी महाविकास आघाडी देखील हायकोर्टाच्या या निर्णयाने अडचनीत आली आहे. तर अनिल देशमुखांचा पाय देखील आणखी खोलात जात आहे.

काही दिवसांपूर्वी परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनेक खळबळजनक खुलासे केले होते. तसेच परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवरही अनेक गंभीर आरोप केले होते. गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी या पत्रातून केला आहे.

अखेर परमबीर सिंह यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. पोलीस आयुक्त पदावरुन हटवून गृह रक्षक दलामध्ये बदली केल्याविरोधात परमबीर सिंह यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून केल्या जाणाऱ्या भ्रष्टाचाराची निःपक्षपाती आणि योग्य सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती.

याप्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यामुळे भाजप नेते आक्रमक झाले आहेत. त्यांनी राज्य सरकारवर टिकेची झोड उठवली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्यातील आघाडी सरकारचे पितळ पुर्णपणे उघडे पडले आहे असे म्हणत भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिश शेलार यांनीही ठाकरे सरकारवर धारेवर धरले आहे.

शेलार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्यातील आघाडी सरकारचे पितळ पुर्णपणे उघडे पडले. तत्कालीन पोलीस आयुक्तांच्या तक्रारीवरुन विद्यमान गृहमंत्र्यांवर गुन्हा दाखल होण्याची वेळ यावी.. यामुळे महाराष्ट्राची देशभरात बदनामी झाली. याला जबाबदार केवळ आणि केवळ ठाकरे सरकारच!

आता तोंड लपवायला जागा न उरल्याने नैतिक जबाबदारी स्विकारुन गृहमंत्र्यांनी राजिनामा द्यावा. तसेच एवढे दिवस तोंडावर “मास्क” लावून शांत बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी आता तरी मौन सोडावे! अशा शब्दांत आशीष शेलार यांनी ठाकरे सरकारवर तुफानी हल्ला चढवला आहे.

महत्वाच्या बातम्या
रोखठोकमधून संजय राऊतांनी गृहमंत्री अनिल देशमुखांना झोडपले; थेट लायकीच काढली
“अनिल देशमुखांवर तोंड उघडू नको म्हणून वरिष्ठांचा दबाव”
आघाडीत बिघाडी: आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ आदेशावरून नाराज काँग्रेस राज्यपालांकडे जाणार
माझ्या औषधाला परवानगी द्या, कोरोना झटक्यात बरा करतो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.