भाजप नेत्याची महाविकास आघाडी सरकारवर खरपूस टीका; ‘या सरकारमध्ये फक्त…’

मुंबई | राळेगणसिद्धीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषण आंदोलनास बसणार होते, मात्र तत्पूर्वी राज्यातील भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री यांच्या संवादानंतर अण्णा हजारेंनी उपोषण आंदोलन मागे घेतले. यानंतर स्वत: आण्णा हजारे यांनी पत्रकार परिषद घेतली.

त्या पत्रकार परिषदेत भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील उभे राहिल्याचे दिसून आले. ‘कधीकाळी मंत्री आणि विरोधी पक्षनेते राहिलेले राधाकृष्ण विखे पाटील यांना बसण्यासही खुर्ची नसल्याचे पाहून गृहमंत्री अनिल देशमुखांनी ही टोला हाणला होता.

आता यालाच प्रत्युत्तर म्हणून विखे पाटील यांनी थेट महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘मोफत वीज देण्याची मागणी कोणी केली नव्हती तर मंत्री घोषणा करून मोकळे झाले होते, या तीन पक्षाच्या सरकारमध्ये फक्त पदांसाठी संघर्ष सुरू आहे,’ असे त्यांनी म्हंटले आहे.

तसेच ‘मुख्यमंत्र्यांना सरकारमध्ये काय चाललंय ते समजत नाही, उपमुख्यमंत्री निर्णय झाला नसल्याचं सांगतात, काँग्रेसचे अस्तित्वच सरकारमध्ये नाही,’ अशी जळजळीत टीका विखे पाटील यांनी केली आहे. याचबरोबर विखे पाटील यांच्या या टिकवे खुद्द देशमुख यांनी उत्तर दिले आहे.

ट्विट करत देशमुख म्हणतात, विखे पाटील जी, सरकारचं एकदम व्यवस्थित चाललंय! तुम्ही काळजी करू नका. मला वाटतं भाजपमध्ये तुमची घुसमट होतेय.काल परवा अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीत ते दिसलंय. तुम्हाला बसायला देखील खुर्ची नव्हती. मान आणि पदांसाठी आमचा नव्हे तुमचाच संघर्ष चाललांय. फक्त तुम्हाला दिसत नाही एवढंच.’

महत्त्वाच्या बातम्या
हे आंदोलन थांबवण्यासाठी आता तुम्हीच पुढे या; मोदी सरकारमधील ‘या’ बड्या मंत्र्यांना पवारांचे आवाहन
राज ठाकरेंनी सांगितला शेतकरी आंदोलनावर तोडगा काढायचा मार्ग…
भाजपला धक्का! ‘या’ बड्या माजी आमदाराचा पक्षाला रामराम; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.