अनिल देशमुख ही मोगलाई नाही, खंडणीखोर गृहमंत्री जेलमध्ये जातील; उच्च न्यायालयाने दिले सीबीआयला चौकशीचे आदेश

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांच्या चौकशीसाठी परमबीरसिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत.

वकील जयश्री पाटील यांनी देखील अनिल देशमुखांच्या चौकशीसाठी याचिका दाखल केली होती. त्या याचिकेचाही विचार न्यायालयाने आपला निकाल देताना केला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर जयश्री पाटलांनी पत्रकार परीषदेत अनेक गंभीर आरोप केले.

अनिल देशमुख ही मोगलाई नाही. याठिकाणी मोगली कायदे चालत नाहीत. इकडे तुमचे राज्य नसून संविधानाचे राज्य चालते. तुम्ही कितीही धमक्या दिल्यात तरी मी मागे हटणार नाही, असे जयश्री पाटील यांनी म्हटले आहे.

मला हे सांगायचं आहे, अनिल देशमुख तुम्ही गृहमंत्री आहात, तुमच्या अंडर महाराष्ट्र पोलीस आहे, त्यामुळे तुम्ही ही चौकशी योग्य प्रकारे करुच शकत नाही. त्यामुळे कोर्टाने सीबीआयकडे प्राथमिक चौकशी दिली आहे.

अनिल देशमुख तुम्ही पॉवरफुल मराठा नेते असाल, शरद पवारांचा तुमच्यावर वरदहस्त असेल, तरी तुम्ही कायद्यापेक्षा, संविधानापेक्षा मोठे नाही. तुम्ही माझं नाव पोलीस डायरीत येऊ दिलं नाही. सरन्यायाधीशांनी म्हटलंय, यांचं नाव डायरीत का नाही, हे दबावतंत्र आहे. शरद पवारांकडून हा दबाव आणलाय. असाही आरोप जयश्री पाटील यांनी केला आहे.

फक्त माझीच याचिका कोर्टाने ऐकली. कोर्टाने माझं खूप कौतुक केलं, कोणीतरी एक शूर आहे, जे समोर आले आहेत. एवढ्या मोठ्या 100कोटीच्या प्रकरणात कोणी एक तरी शूर आहे जे समोर आले आहेत, असे कोर्टाने सांगितल्याची माहिती जयश्री पाटील यांनी दिली.

दरम्यान हा निर्णय अनिल देशमुखांना मोठा झटका मानला जातोय. १५ दिवसांत सीबीआयने ही चौकशी पुर्ण करावी असे आदेश कोर्टाने दिले आहेत. अनिल देशमुखांनी दर महीन्याला १०० कोटी रूपयांच्या वसूलीचे टार्गेट पोलीसांना दिले होते असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी केला होता.

ह्या चौकशीनंतर अनेक घडामोडी व गौप्यस्फोट बाहेर येण्याची शक्यता आहे. आजपर्यंत अनिल देशमुखांच्या चौकशीला नकार देणारी महाविकास आघाडी देखील हायकोर्टाच्या या निर्णयाने अडचनीत आली आहे. तर अनिल देशमुखांचा पाय देखील आणखी खोलात जात आहे.

काही दिवसांपुर्वी मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. गृहमंत्र्यांनी दरमहा १०० कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला होता. या आरोपांच्या चौकशीची मागणी त्यांनी केली होती. ती हायकोर्टाने मान्य केली आहे.

महत्वाच्या बातम्या
अनिल देशमुखांचा पाय खोलात; उच्च न्यायालयाने दिले सीबीआय चौकशीचे आदेश

माझ्या औषधाला परवानगी द्या, कोरोना एका झटक्यात बरा करतो; डॉक्टरचं थेट आयुष मंत्रालयाला आवाहन
अनंत करमुसे मारहाण प्रकरणात जितेंद्र आव्हाड पुरते अडकले; हायकोर्टाने दिले निर्देश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.