अनिल देशमुखांच गृहमंत्रीपद धोक्यात? शरद पवार घेणार मोठा निर्णय

मुंबई : अँटिलियाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या आणि त्यामधील सचिन वाझे यांचा कथित सहभाग या मुद्द्यांवरून मुंबई पोलिसांच्या कामगिरीवर आणि गृहमंत्रालयाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं होतं.

अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे मंत्री तसेच महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावल्यानं गृहमंत्री बदलाच्या चर्चांनी जोर धरला आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात असल्याचं चित्र विरोधकांकडून दाखवलं जात आहे, त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिपद धोक्यात असल्याचं बोललं जातं आहे.

याबाबत शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली, यात सचिन वाझे प्रकरणावरून चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच यात मंत्रिमंडळ फेरबदलाबाबतही पवार आणि ठाकरेंमध्ये चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवार गृहमंत्री अनिल देशमुखांबद्दल काय भूमिका घेणार हे काही वेळातच समोर येईल. देशमुख यांच्याऐवजी हे मंत्रिपद दिलं जाऊ शकतं, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. या प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच जयंत पाटील यांच्या नावांचा विचार सुरु असल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

आता खरी विकेट पडली! जसप्रित अडकला लग्नबेडीत, पहा लग्नाचे खास व्हायरल फोटो

दिलेले वचन माधुरीने पुर्ण केले, खेड्यातील गरीब मुलाला घेतले डान्स दिवानेमध्ये, पहा व्हिडीओ

बॉलीवूडचे हॅंडसम हंग विनोद खन्नाच्या वडीलांनी ताणली होती त्यांच्यावर बंदूक; कारण ऐकून थक्क व्हाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.