१०० कोटी वसुलीचे आरोप अनिल देशमुखांकडे कोटींची संपत्ती, रिलायन्सशी भागीदारी; जाणून घ्या..

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचे आरोप लावले होते, या प्रकरणात अनिल देशमुखांना खुर्चीवरून पायउतार व्हावं लागलं आहे. हायकोर्टाने या प्रकरणाची १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआय दिले आहेत.

त्यानंतर अनिल देशमुखांनी नैतिकतेच्या आधारावर गृहमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. चौकशीचा आदेश होताच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. मात्र तुम्हाला माहीत आहे का? त्यांच्याकडे किती कोटींची मालमत्ता आहे.

रिलायन्सशी भागीदारी…
अनिल देशमुख यांनी २४२ रुपयांचे रिलायन्स पॉवरमध्ये ९३ शेअर्स खरेदी केले आहेत. दुसरीकडे ८७६० रुपयांमध्ये Integra Engineering चे २०० शेअर्स खरेदी केलेत, रिलायन्स इंडस्ट्रीजचे १२० शेअर्स १५,६४४४ रुपयांत खरेदी केले आहेत.

याशिवाय देशमुख यांनी ३२०० रुपयांमध्ये रमा पेट्रोकेमिकल्सचे ४०० शेअर्स खरेदी केले असून, ग्लेनमार्क फार्माच्या शेअर्समध्ये १६,२९५ रुपये गुंतवले आहेत, ल्युपिनच्या शेअर्समध्ये 20,३५८ रुपये, मारुतीच्या शेअरमध्ये १६९६५० रुपये गुंतविले आहेत.

दरम्यान, नागपूर जागेवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार म्हणून देशमुख हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आलेत. ADR वरील उपलब्ध माहितीनुसार, त्यांची एकूण मालमत्ता १४.५७ कोटी आणि लाएबिलिटी ४.५६ कोटी रुपये आहे.

तर आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये त्यांनी १६ लाख ८५ हजार १९३ रुपये परतावा दाखल केला. ३.१२ लाख रोख आणि ७ .२५ लाख बँक आणि वित्तीय संस्थांमध्ये जमा करण्यात आले आहेत. त्याशिवाय त्यांनी बाँड, शेअर्स आणि डिबेंचरमध्येही ३.८६ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

सट्टेबाजीत ३० लाखांचं नुकसान झाल्यानंतर तारक मेहतामधील ‘हा’ बडा अभिनेता बनला चोर

अमित शहांना नक्षलवाद्यांचे पत्रकातून थेट आव्हान; ‘कोणा-कोणाचा सूड घेणार?’

मोकळ्या झोपड्यांत घुसले जवान पण तिथेही टाकलं होतं जाळं; वाचा कसे झाले २२ जवान शहीद

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.