अनिल देशमुखांना धक्का; अखेर विरोधकांसमोर गुडघे टेकत महाविकास आघाडीने घेतला ‘हा’ निर्णय

विरोधकांच्या मागणीसमोर गुडघे टेकत महाविकासआघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने अनिल देशमुख यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंग (Parambir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे राज्यात खळबळ उडाली. या आरोपांची चौकशी करण्यात येणार आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांसाठी हा मोठा धक्का आहे. निवृत्त न्यायमूर्तींच्यामार्फत याप्रकरणाची चौकशी करण्यात येईल. राज्य सरकारकडून यासाठीच्या चौकशी आयोगाची लवकरच नियुक्ती करण्यात येईल.

परमबिर सिंग यांचं गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप करणारं खळबळजनक पत्र मेल केले होते. यात गृहमंत्र्यांनी मुंबईतल्या रेस्टॉरंट आणि बारमधून महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट दिल्याचा आरोप करण्यात आला होता. परमबिर सिंग यांनी हे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांना पाठवलं होतं.

हे पत्र समोर येताच विरोधी पक्ष  भाजपने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पण महाविकास आघाडी सरकारकडून ही मागणी फेटाळण्यात आली होती.

त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा बचाव करण्यासाठी खुद्द शरद पवार यांना मैदानात उतरावं लागलं. त्यांनी यासंदर्भात दिल्लीत दोन तीन पत्रकार परीषदा घेतल्या होत्या. यावेळी त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ठाम पाठराखण करत विरोधकांच्या आरोपांच्या ठिकऱ्या उडवल्या होत्या.

तसेच गृहमंत्री अनिल देशमुख राजीनामा देणार नसल्याचं सांगीतले होते.  परमबिर सिंग यांचे आरोप खोटे आहेत असं म्हणत अनिल देशमुखांची चौकशी देखील करणार नसल्याचं शरद पवारांनी सांगीतलं होतं.

परंतू आता मात्र महाविकास आघाडी सरकारने अनिल देशमुखांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.  निवृत्त न्यायमूर्तींच्यामार्फत याप्रकरणाची चौकशी करण्यात येईल. राज्य सरकारकडून यासाठीच्या चौकशी आयोगाची लवकरच नियुक्ती करण्यात येणार आहे.

सचिन वाझे प्रकरणावरून मुंबई पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांची बदली करण्यात आली. त्यानंतर
दरम्यान परमबिर सिंग यांनी याप्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर आज सुनावणी झाली. या प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयात व्हावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.

महत्वाच्या बातम्या
माजी पोलीस अधिकाऱ्याने गंभीर आरोप केलेले ते बंटी बबली म्हणजे फडणवीस आणि रश्मी शुक्ला?
अनिल देशमुखांना वाचवणारे शरद पवारांचे सगळे मुद्दे फडणवीसांनी पुराव्यानिशी खोडले; वाचा..
त्यामुळे दिल्लीतील शरद पवारांच्या पत्रकारपरिषदेत खोटेपणा उघडा पडला  देवेंद्र फडणवीस

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.