ठाकरे सरकारचा रामदेव बाबांना दणका! पतंजलीच्या औषधाला महाराष्ट्रात परवानगी नाही

मुंबई : काही दिवसांपूर्वीच योगगुरु बाबा रामदेव यांनी कोरोनावर रामबाण उपाय शोधल्याचा दावा केला होता. तसेच पतंजलीने करोना विरोधात ‘कोरोनिल’ प्रभावी असून, याला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिल्याचा दावा केला. मात्र योग गुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने बनवलेल्या ‘कोरोनिल’ औषधावर वाद निर्माण झाला आहे.

कोरोना व्हायरसवरवरील उपचारासाठी कोणत्याही पारंपरिक औषधाला मान्यता दिली नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनेच स्पष्ट केल्यामुळे ‘कोरोनिल’ औषधाला जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणिकरणानुसार आयुष मंत्रालयाने मान्यता दिल्याचा पतंजली आयुर्वेद कंपनीचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोरोनिल संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. “सक्षम आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय पतंजलीच्या कोरोनिल औषध विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही” असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

“पतंजलीच्या कोरोनिल औषधाच्या वैद्यकीय चाचणीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने प्रश्न उपस्थित केले असून, जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा हे औषध करोनावर परिणामकारक असल्याचा पतंजली आयुर्वेदचा चुकीचा दावा फेटाळला आहे. इतक्या घाईने हे औषध बाजारात आणण आणि दोन ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी याला समर्थन देणं योग्य नाही.” असे देशमुख यांनी म्हटले आहे.

बाबा रामदेव यांना अटक होणार?
ट्विटरवर #ArrestRamdev हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे. बाबा रामदेव यांना फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात यावी अशी मागणी अनेकजण करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने तरी कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सोबतच लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हक्क नाही, अशा शब्दात बाबा रामदेव यांना लक्ष करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या
‘संजय राठोड हे ठाकरे सरकारमधील गजा मारणे’
धक्कादायक! सापाने दंश केल्यानंतर मुलीला रुग्णालयाऐवजी नेले बाबाकडे, अन्…
दुसऱ्या मुलाला हॉस्पिटलमधून घरी घेऊन गेले सैफ- करिना; पहा बाळाची पहिली झलक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.