अनिल देशमुख आता पुरते अडकले! मुंबई नागपुरातील घरांवर सीबीआयने टाकले छापे

मुंबई । काही दिवसांपूर्वी राजीनामा दिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे घर, कार्यालयावर सीबीआयने छापा टाकला आहे. तसेच त्याच्यावर एफआयआर देखील दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या मुंबई, नागपूर येथील दहा ठिकाणी सीबीआयने छापे टाकले आहे. नुकतेच शंभर कोटींच्या वसुलीचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबिर सिंह यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. सचिन वाझे याने देशमुखांवर आरोप केला होता. दर महिन्याला शंभर कोटीची वसूलीचे आदेश देशमुखांनी आपल्याला दिला होता, असा आरोप वाझे याने केला होता.

सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी सीबीआयने करावी असा आदेश दिला होता, त्यानंतर सीबीआयने देशमुख यांची चौकशी केली होती. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

राज्यात हे प्रकरण चांगलेच गाजले होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा खराब होण्याची शक्यता असतानाच त्यांनी आपला राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला होता. मात्र त्यांच्या अडचणी थांबताना दिसत नाहीत.

अनिल देशमुख सध्या नागपुरात आहेत. त्यांनी आजच्या कारवाईबाबत प्रतिक्रिया दिली नाही. मात्र त्यांची अडचण मात्र वाढली आहे. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकं प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली.

त्यानंतर या प्रकरणावरून बराच गदारोळ सुरू झाल्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून तत्कालीन आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली होती. सिंह यांच्याकडून तपास चुका झाल्याचे विधान अनिल देशमुख यांनी केल्यानंतर सिंह यांनी लेटरबॉम्ब टाकला आहे. आता सीबीआयने छापा टाकल्याने त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

ताज्या बातम्या

..तर राजकारणात मोदींना उद्धव ठाकरेंचा आदर्श ठेवावा लागेल! प्रसिद्ध राजकीय विश्लेषकाचे मत

जगनमोहन रेड्डींची मोठी घोषणा, महाराष्ट्राला देणार ३०० व्हेंटिलेटर, गडकरींनी मानले आभार

राज्यात अत्यावश्यक प्रवासासाठी आता लागणार ई-पास; असा काढा ई-पास

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.