ब्रेकिंग: सीबीआय चौकशीचा निर्णय योग्यच; सुप्रिम कोर्टाचा अनिल देशमुखांना मोठा झटका

सर्वोच्च न्यायालयाने आता अनिल देशमुखांना दणका दिला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख सीबीआय चौकशी करण्यासाठी टाळाटाळ करत होते पण आता त्यांना सीबीआय चौकशीला सामोरे जावेच लागणार आहे. परमबीर सिंह लेटरबॉम्ब प्रकरणात त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले होते.

त्यानंतर अनिल देशमुखांनी सुप्रिम कोर्टाला मागणी केली होती की, या प्रकरणात आपली बाजू कोणीच ऐकूनच घेतली नाही. त्यामुळे सीबीआयकडून होणारी आपली चौकशी रोखण्यात यावी. मात्र सीबीआय चौकशीचा निर्णय योग्य आहे असे सांगत सुप्रिम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय उचलून धरला आहे.

या निर्णयानंतर आता त्यांच्याकडे सीबीआय चौकशीला सामोर जाण्याच्या ऐवजी कुठलाही पर्याय उरलेला नाही. सुप्रिम कोर्टाने दिलेल्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीलाही मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिल्यामुळे अनिल देशमुखांना आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

त्यानंतर अनिल देशमुख दिल्लीला रवाना झाले होते. त्यांनी त्याठिकाणी ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, आरोप अतिशय गंभीर आहेत. आयुक्तांपासून गृहमंत्र्यांपर्यंत सर्वांवरच गंभीर आरोप झाले आहेत.

गृहमंत्र्यांनी जरी राजीनामा दिला असला तरी उच्च न्यायालयाचा निर्णय चुकीचा आहे असे म्हणता येणार नाही. यापुर्वी जेव्हा आदेश देण्यात आले होते तेव्हा ते पदावरच कार्यरत होते. याप्रकरणाचे एकूण गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणाची स्वतंत्र खोलवर चौकशी होणे गरजेचे आहे.

नेमकं काय आहे प्रकरण…
IPS परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीलं होतं की, मार्चच्या मध्यावर वर्षा बंगल्यावर मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो. तिथं अँटीलियाच्या केसबद्दल पूर्ण माहिती देत होतो. त्यावेळेसच मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कामाबद्दलही तुमच्या कानावर घातलं.

एव्हढंच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार तसच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही देशमुखांच्या चुकीच्या कृतीची माहिती दिली. तिथं उपस्थित असलेल्या इतर मंत्र्यांना खरं तर ही माहिती आधीच होती असं माझ्या लक्षात आलं.

सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करायला सांगितलं. फेब्रुवारीच्या मध्यावर वाझेंना शासकीय निवासस्थानावर बोलवून गृहमंत्री देशमुखांनी ही सूचना केली.

त्यावेळेस देशमुखांचे पर्सनल सेक्रेटरी पलांडे हेही हजर होते. एक दोन घरातले स्टाफ मेंबरही हजर होते. एवढच नाही तर शंभर कोटी रुपये गोळा करण्यासाठी काय करायचं हेही देशमुखांनी सांगितलं.

त्यात देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत, आणि त्यातल्या प्रत्येकाकडून दोन ते तीन लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला चाळीस ते पन्नास कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर सोर्सेकडून जमा करता येईल.

महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी: अनिल देशमुखांचा पाय आणखी खोलात, सुप्रीम कोर्टाने दिला दणका
भाषणादरम्यान अजित पवारांना एकाने दिला मास्क काढण्याचा सल्ला, अजित पवार म्हणाले..
रुग्णवाहिका मिळत नसेल तर पटकन करा ‘या’ नंबरवर फोन, १५ ते २० मिनिटांत होईल उपलब्ध

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.