बिग ब्रेकींग! अनिल देशमुखांना अटक? १०० कोटींच्या खंडणी प्रकरणी सीबीआयने घेतलं ताब्यात

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर आणि कार्यालयावर सीबीआयने छापा टाकला आहे. तसेच त्यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांची पुन्हा चौकशी सुरू होणार आहे. देशमुखांना नागपूर येथील घरातून ताब्यात घेण्यात आले आहे.

यामुळे चौकशी झाल्यानंतर त्यांना अटक देखील होण्याची शक्यता आहे. त्यांच्या मुंबई, नागपूर येथील दहा ठिकाणी सीबीआयने छापे टाकले आहे. नुकतेच शंभर कोटींच्या वसुलीचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबिर सिंह यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. सचिन वाझे याने देशमुखांवर आरोप केला होता. दर महिन्याला शंभर कोटीची वसूलीचे आदेश देशमुखांनी आपल्याला दिला होता, असा आरोप वाझे याने केला होता.

सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी सीबीआयने करावी असा आदेश दिला होता, त्यानंतर सीबीआयने देशमुख यांची चौकशी केली होती. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

राज्यात हे प्रकरण चांगलेच गाजले होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा खराब होण्याची शक्यता असतानाच त्यांनी आपला राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला होता. मात्र त्यांच्या अडचणी थांबताना दिसत नाहीत.

अनिल देशमुख सध्या नागपुरात आहेत. त्यांनी आजच्या कारवाईबाबत प्रतिक्रिया दिली नाही. मात्र त्यांची अडचण मात्र वाढली आहे. राज्य सरकारसाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

ताज्या बातम्या

जगनमोहन रेड्डींची मोठी घोषणा, महाराष्ट्राला देणार ३०० व्हेंटिलेटर, गडकरींनी मानले आभार

..तर राजकारणात मोदींना उद्धव ठाकरेंचा आदर्श ठेवावा लागेल! प्रसिद्ध राजकीय विश्लेषकाचे मत

वुमन पावर! शिक्षण फक्त चौथी पास, वय ५२ वर्षे, वार्षिक उलाढाल तब्बल ३ कोटी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.