“अनिल देशमुख व अनिल परब केवळ प्यादी, खरे सूत्रधार तर ‘सिल्व्हर ओक’वर आणि ‘वर्षा’वर बसलेत”

मुंबई । राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर आज ईडीने छापा टाकला. यामुळे एकच खळबळ उडाली. यामुळे आता राज्य सरकारकर टीका केली जात आहे. भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आता टीका केली जात आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आता खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत असा आरोप केला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. तसेच त्यांनी ट्विटमध्ये त्यांनी अनिल परब आणि अनिल देशमुख हे दोघेही केवळ प्यादी असल्याचेही म्हटले आहे.

ते म्हणाले ईडीची कारवाई ज्यांच्यावर झाली ते अनिल देशमुख आणि त्याच प्रकारचे आरोप असलेले अनिल परब ही प्यादी आहेत. खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसले आहेत. यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात आज ईडीने कारवाई केली. नागपूरसह वरळीच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. ईडीकडून एकीकडे अनिल देशमुखांच्या नागपूरमधील निवासस्थानी छापा टाकण्यात आलेला असताना दुसऱ्य़ा टीमने वरळीच्या सुखदा इमारतीमधील घरावरही छापा टाकला.

या कारवाईत घराची झाडाझडती सुरु आहे. यामुळे काही महत्त्वाचे हाताला लागण्याची शक्यता आहे. ईडीने मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. दुसरीकडे सीबीआयनेही अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला असून तपास सुरु आहे.

आता ईडीने गुन्हा दाखल करत कारवाईला सुरुवात केली होती. यामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांना या प्रकरणी अटक केली जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

अरे बाप रे! काळा चष्मा लावणं नवरदेवाला पडलं महागात; नवरीने मंडपातच मोडलं लग्न

VIDEO; पप्पीसाठी प्रियकरानं स्त्यावरच मांडला ठाण, शेवटी तरुणीनं भर रस्त्यात केलं असं काही की…

shocking! अभिनेत्रीने मागवलेल्या ऑनलाईन भातात आढळलं झुरळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.