नेत्यांच्या सभा होतात पण उद्योगांना बंदी; अनिल अंबानीच्या मुलाची ठाकरे सरकारवर बोचरी टीका

 

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्यामुळे आता कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारकडून काही निर्बंध घालण्यात आले असून राज्यभरात मिनी लॉकडाऊन करण्यात आला आहे.

अशात काही लोकांनी ठाकरे सरकारवर टीकाही केली आहे. आता उद्योगपती अनिल अंबानी यांचा मुलगा अनमोल अंबानी यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. नेत्यांच्या सभा होतात, पण उद्योगांना बंदी, अशी बोचरी टीका अनमोल अंबानी यांनी केली आहे.

अत्यावश्यक सेवा म्हणजे नेमकं काय? कलाकार शूटिंग करत आहे, राजकिय नेते मोठ्या संख्येने रॅली घेत आहे. मग उद्योग आणि काम हे अत्यावश्यक सेवेमध्ये येत नाही का? प्रत्येक व्यक्तीला काम अत्यावश्यक आहे, असे म्हणत अनमोल अंबानी यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य भरात काही निर्बंध लावण्यात आली आहे. त्यामध्ये खाजगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आले आहे, तर हॉटेल्स, मनोरंजन ठिकाणी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

तसेच सरकारने लागू केलेले हे नवे नियम ३० एप्रिलपर्यंत लागू असणार आहे. यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवांना सुरू ठेवण्यात आले आहे, त्यामध्ये किराणा, मेडिकल दवाखाने या गोष्टी सुरू आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.