रेल्वेत भगव्या कपड्यांमध्ये वेटर दिसल्याने संत भडकले, रेल्वेने तातडीने घेतला मोठा निर्णय..

रेल्वेने सध्या खास रामायण यात्रा ट्रेनला सुरुवात केली आहे. यामुळे अनेकजण या यात्रेत सहभागी होत आहेत. भगवान श्रीराम यांच्या भक्तांसाठी ही एक पर्वणी आहे. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘देखो देश अपना’ या मोहिमेअंतर्गत डिलक्स एसी टूरिस्ट ट्रेन सुरू केली आहे.

असे असताना आता यावरून मात्र मोठा वाद निर्माण झाला आहे. या ट्रेनमध्ये सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ड्रेस कोडवरुन हा वाद सुरू आहे. ‘रामायण एक्स्प्रेस’मधील रेल्वेच्या कर्मचाऱ्यांच्या ड्रेस कोडचा रंग भगवा ठेवण्यात आला होता. अनेकांनी यावर आक्षेप घेतला आहे.

यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. उज्जैनच्या संतांनी रेल्वेने जर कर्मचाऱ्यांचा ड्रेस कोड बदलला नाही तर १२ डिसेंबर रोजी ‘रामायण एक्स्प्रेस’ रेल्वेला दिल्ली अडवले जाईल असा इशारा दिला होता. यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले आहे.

ड्रेस कोडचा रंग भगवा ठेवणे हा तर हिंदूंचा अपमान असल्याचे संतांचे म्हणणे आहे. यानंतर मात्र रेल्वेने रामायण एक्स्प्रेस मधील कर्मचाऱ्यांचा ड्रेस कोड बदलण्याचा निर्णय घेतला. यामुळे आता सर्व्हिस स्टाफ प्रोफेशनल कपड्यांमध्ये दिसणार आहेत.

झालेल्या असुविधेसाठी आम्ही खेद व्यक्त करतो, असेही रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. यामुळे संतांनी देखील आपली भूमिका मागे घेतली आहे. दरम्यान, रेल्वेत प्रवाशांना सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना भगव्या रंगाचा पोशाख आणि गळ्यात रुद्राक्षांच्या माळा देण्यात आल्या होत्या.

याबाबत हा प्रकार हिंदू धर्माचा आणि संतांचा अपमान करणारे आहे, असे अवधेशपुरी यांनी रेल्वेमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले होते. कर्मचाऱ्यांचा ड्रेसकोड न बदलल्यास सर्व साधू रेल्वे रुळावर बसून रामायण एक्स्प्रेसला रोखतील असा इशारा देखील त्यांनी दिला होता. यामुळे प्रकरण वाढले होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.