Share

Raj Thackeray: “सरकारला जर थोडी साधनशुचिता उरली असेल, तर स्वतःच्या लोकांवर कारवाई करा!”, राज ठाकरे आक्रमक

Raj Thackeray:  राजकीय व सामाजिक शिस्तीला लज्जास्पद कलंक लावणारी घटना विधानभवन परिसरात घडल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नाव न घेता भाजप (BJP) पक्षावर सडकून टीका केली असून, गलिच्छ राजकारण, शेरेबाजी व गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठीशी घालणाऱ्या धोरणांचा निषेध केला आहे.

विधानभवनात मारहाण

मुंबई (Mumbai) येथील विधानसभेच्या प्रांगणात झालेल्या निंदनीय मारहाणीच्या घटनेनं महाराष्ट्राची (Maharashtra) मान पुन्हा एकदा खाली गेली. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांना गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या घटनेवर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षाच्या कार्यपद्धतीवर कठोर शब्दांत रोष व्यक्त केला.

“सत्ता हे साधन असावं, साध्य नाही!” 

राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, “सत्ता ही केवळ साधन असायला हवी, साध्य नाही. पण आज वाट्टेल त्या व्यक्तींना पक्षात घेऊन इतर पक्षांतील ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ टीका करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो आणि नंतर साधनशुचितेच्या गप्पा मारल्या जातात.”
त्यांनी मराठी जनतेला विचारलं – “कोणाच्या हातात दिला आहे महाराष्ट्र?”

सरकारवर थेट आरोप, आणि आव्हानही!

राज यांनी स्पष्ट शब्दांत सरकारला उद्देशून म्हटलं की, “जर तुमच्यात थोडीशी का होईना, साधनशुचिता शिल्लक असेल तर तुमच्याच लोकांवर कारवाई करून दाखवा. अन्यथा आमचे महाराष्ट्र सैनिक हातातलं घेतील आणि मग आम्हाला अक्कल शिकवू नका.”

“मराठी माणसाचा अपमान आम्हाला खपणार नाही!”

राज ठाकरे यांनी आपल्या प्रतिक्रिया पोस्टमध्ये मराठी अस्मितेचा मुद्दा देखील उपस्थित केला. त्यांनी म्हटलं की, “कोणी जर मराठी भाषेला किंवा मराठी माणसाच्या अस्तित्वाला धक्का दिला तर माझे कार्यकर्ते आवाज उठवणारच, आणि त्यासाठी मला अभिमान वाटतो.” त्यांनी यासोबतच विधानभवनात एक दिवस चालणाऱ्या अधिवेशनाचा खर्च लाखोंमध्ये असल्याचे सांगून प्रश्न केला की, “ही लाखो रुपयांची बैठक गलिच्छ टीका आणि वैयक्तिक हल्ले करण्यासाठी आहे का?”

राज ठाकरे यांनी राज्याच्या आर्थिक संकटावरही भाष्य केलं. “राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, जिल्ह्यांना निधी मिळत नाही, कंत्राटदारांचे पैसे थकले आहेत आणि हे सत्ताधारी मात्र भंपक राजकारण करण्यात मग्न आहेत,” अशी सडकून टीका त्यांनी केली.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now