शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. यावेळी काही आंदोलनकर्त्यांनी शरद पवार यांच्या घरावर दगडफेक केली होती. तसेच एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरात घुसण्याचा देखील प्रयत्न केला होता. सर्व राजकीय पक्षातील नेत्यांनी या घटनेचा निषेध केला होता.(Angry question of Marathi director regarding attack on Pawar’s house)
या घटनेवरून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले होते. भाजपने देखील या आरोपांना प्रत्युत्तर दिले होते. या घटनेनंतर आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने या प्रकरणात आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या सर्व घटनेवर प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी मत व्यक्त केलं आहे. “एसटी कामगारांचा उद्रेकसमर्थन करण्यासारखा नसला तरी त्यांच्यावर ही वेळ का आली? याचा विचार करायला हवा”, असा सवाल प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी उपस्थित केला आहे. मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.
त्या ट्विटमध्ये मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी लिहिले आहे की, “माझा बाप गिरणी कामगार होता. त्या संपानंतर उध्वस्त होणारी घरं मी पाहिली आहेत. एसटी कामगारांचा उद्रेक समर्थन करण्यासारखा नसला तरी त्यांच्यावर ही वेळ का आली? याचा विचार करायला हवा. राजकारणी फक्त घरं भरतायत हे जनतेच्या मनात घर करू लागलंय.”
माझा बाप गिरणी कामगार होता. त्या संपानंतर उध्वस्त होणारी घरं मी पाहिली आहेत. एस टी कामगारांचा उद्रेक समर्थन करण्यासारखा नसला तरी, ही वेळ का आली? याचा विचार नक्कीच करायला हवा. राजकारणी फक्त घरं भरतायत हे जनतेच्या मनात घर करू लागलय. #सावधान
— 🄺🄴🄳🄰🅁 🅂🄷🄸🄽🄳🄴 (@mekedarshinde) April 8, 2022
या ट्विटमध्ये मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ‘सावधान’ हे हॅशटॅग वापरले आहे. हे ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी या ट्विटवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. मराठी दिग्दर्शक केदार शिंदे सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असतात. राज्यातील आणि देशातील वेगवेगळ्या प्रश्नांवर दिग्दर्शक केदार शिंदे सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असतात.
गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक महत्वाचा निर्णय दिला होता. कुठल्याही एस टी कर्मचाऱ्यावर कारवाई न करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. तसेच एस टी कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन आणि ग्रॅच्युईटी देण्याचे निर्देश देखील न्यायालयाकडून राज्य सरकारला देण्यात आले आहेत. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी काही एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला होता.
महत्वाच्या बातम्या :-
भ्रष्टाचाराप्रकरणी सोमय्या पितापुत्रांच्या अटकेचा मार्ग मोकळा; कोर्टाने दिला ‘हा’ निर्णय
इम्रान खान यांच्यानंतर शरीफ यांची पंतप्रधानपदी निवड, भारतावर याचा काय परिणाम होणार?
फुले दाम्पत्याचा संघर्ष मोठ्या पडद्यावर; ‘हा’ प्रसिद्ध बाॅलीवूड अभिनेता साकारणार ज्योतीबांची भूमिका