VIDEO:‘त्या’ अभिनेत्रीला मिठी मारणे रितेशला पडले महागात, घरी गेल्यानंतर जेनेलियाने धु-धु धुतला

मुंबई | बॉलिवूडचं क्यूट कपल असलेली मराठमोळी जोडी रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनलिया देशमुख सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. दोघंही आपल्या चाहत्यांसाठी मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात. पण यावेळी शेअर केलेला व्हिडीओ खास आहे. या व्हिडीओत जेनेलियाने चक्क रितेशची धुलाई केली आहे.

जेनेलियाने तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. खर तर या व्हिडीओचा संदर्भ फार जूना आहे. परंतु जेनेलिया आता या व्हिडीओवर व्यक्त होताना दिसत आहे. तुम्ही याआगोदर हा व्हिडीओ पाहिला असेल. आता या व्हायरल व्हिडीओला जेनेलियाने व्हिडीओ शेअर करतच उत्तर दिले आहे.

त्याचं झालं असं की, सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसापासून रितेश,जेनेलिया आणि प्रिती झिंटा यांच्यातील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत चाहते अनेक भन्नाट कॅप्शन देत आहेत. काहींनी याचे मिम्स केले आहेत. यामध्ये नेटकरी लिहितात, ‘घरी गेल्यानंतर रितेशचं काय होणार?’

भर पार्टीत रितेश प्रितीसोबत बोलताना जेनेलियाला स्पष्ट दुर्लक्ष करताना दिसतो. व्हिडीओत जेनेलिया एकदम बिचारी दिसते. कहर म्हणजे रितेश जेनेलियासमोरच प्रितीला मिठी मारताना दिसून येतो. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला अन् नंतर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आता याबाबत जेनेलियाने घरी पोहचल्यानंतर काय होत ते चाहत्यांना सांगितले आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत रितेशची ती चांगलीच धुलाई करत असल्याचे म्हटले आहे. तिने एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. यावर चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.