चक्क १००० मधमाश्यांना अंगावर घेत ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केले फोटोशुट; पहा व्हिडिओ

सेलिब्रीटी नेहमीच त्यांच्या हटके फोटोंमुळे चर्चेत येत असतात. कोणी टॉपलेस फोटोमुळे चर्चेत येतं, तर कोणी हॉट आणि बोल्ड फोटोमुळे चर्चेत येतं. हॉलिवूडमध्ये अभिनेत्री एँजेलिना जोली तिच्या हटके फोटोमुळे चर्चेत येत असते.

एँजेलिनाना हॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यामुळे ती सतत वेगवेगळ्या फोटोंमुळे आणि हटके स्टाईलच्या फोटोशुटमुळे चर्चेत असते. आता पुन्हा अशाच एका फोटोशुटमुळे एँजेलिना चर्चेत आली आहे.

यंदाचे फोटोशुट पाहून तिचे चाहतेही चक्रावून गेले आहे, कारण यावेळेस तिने चक्क मधमाश्यांना अंगावर घेऊन फोटोशुट केले आहे. तिच्या या फोटोशुटचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

एँजेलिनाने हे फोटोशुट आंतरराष्ट्रीय मधमाशी दिवस सादरा करण्यासाठी केले होते. या दिवसानिमित्तच एँजेलिनाने जवळपास १००० मधमाश्यांसोबत हे फोटोशुट केले आहे. त्यामध्ये मधमाश्या तिच्या कपड्यांवर दिसत आहे.

फोटोमध्ये दिसत आहे, की मधमाश्या एँजेलिनाच्या कपड्यावर, डोळ्यांवर, गळ्यावर बसलेल्या आहे. एँजेलिनाने फोटोशुटसाठी एक ऑफ द शोल्डर टॉप घातला आहे. या सर्व मधमाश्या डॅन विन्टर्स यांच्या पाळीव मधमाश्या आहे.

विशेष मधमाश्या एँजेलिनाच्या अंगावर तब्बल १८ मिनिटे होत्या. तसेच या शुटबद्दल बोलताना, मधमाश्या शांत राहाव्या आणि त्यांनी एँजेलिनाला कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये, त्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली होती, असे डॅनने सांगितले आहे. या फोटोशुटमुळे एँजेलिनाच्या खुप कौतूक केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

गुजरातला जाणाऱ्या कारमध्ये सापडले घबाड; मशीन आणल्या तरी रात्रभर नोटा मोजून होईना
दिग्दर्शक प्रकाश झा यांची पहीली पत्नी होती सेक्स वर्कर? रातोरात बदलले होते घर
बंगालमध्ये पुन्हा घरवापसी, भाजपमध्ये गेलेले नेते पुन्हा तृणमूलमध्ये दाखल; भाजपवर डाव उलटला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.