भावाचा नाद नाय! हाय हिल्स घालून असा धावला की थेट वर्ल्ड रेकॉर्डच केला; पहा व्हिडिओ

अनेकदा महिला हाय हिल्स घालून एखाद्या कार्यक्रमाला येताना दिसतात, तसेच रॅम्पवॉक करताना दिसतात. पण सुरुवातीला महिलांनी हाय हिल्स घालून चालणे खुप कठिण जाते. काही महिलांना हाय हिल्स घालून चालायचं कसं असाही प्रश्न अनेकांना पडतो.

अशात सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक पुरुष चक्क हाय हिल्स घालून पळताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

या व्हिडिओमध्ये हाय हिल्स घालून एक पुरुष वाऱ्यासारखा सारखा धावला आहे. त्याने असा धावण्याचा विश्व विक्रम केल्याने त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली आहे. या तरुणाचे नाव अँड्रे ओर्टोल्फ असे आहे.

अँड्रे हा जर्मनीतील नागरीक आहे. त्याने हाय हिल्स घालून सर्वात वेगाने धावण्याचा विक्रम केला आहे. १४.०२ सेकंदात तो १०० मीटर धावला आहे. त्याने हा रेकॉर्ड १४ जून २०१९ मध्ये केला होता. अँड्रे स्वत:चाच रेकॉर्ड मोडत असतो.

अँड्रेचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याचा हा व्हिडिओ पाहून महिलांनाही त्याचे कौतूक वाटत आहे. अनेक महिला हाय हिल्स घालून चालण्याचाही विचार करत नाही, असे असताना अँड्रेने हाय हिल्स घालून पळून दाखवले आहे.

या व्हिडिओवर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामध्ये अनेक महिलांनीही कमेंट केल्या आहे. एकीने आपण साधे चालूही शकत नाही, असे म्हटले आहे. तर दुसरीने व्हिडिओ पाहून माझ्या टाचा दुखायला लागल्या अशी कमेंट केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

VIDEO: धक्कादायक! केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्यावर हल्ला; काचा फोडल्या अन्…
कॉमेडी क्विन भारती सिंहची झाली फजिती; पहा व्हिडिओ
“देशाला कोरोनाविरुद्ध लढायचे असेल तर महाराष्ट्र मॉडेलचा वापर करावाच लागेल”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.