अंधश्रद्धेचा झाला कहर; कोरोना होऊ नये म्हणून ‘या’ गावात केली खंडीभर बोकडांची जत्रा

महामारीमुळे अंधश्रद्धा पण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आनंदवाडी गावची पण अशी अंधश्रद्धा आहे की त्या गावातील लोक देवीमुळेच प्रसन्न आहेत.

या गावात कोरोनाने प्रवेश करू नये म्हणून खंडीभर बोकडांचे बळी दिले गेले आहेत. गावातले लोक छातीठोकपणे सांगतात की त्यांच्या गावात एक पण कोरोना रुग्ण नाही. तेथील लोकांनी ना लास घेतली आहे ना ते तोंडाला मास्क लावतात.

पण त्यांच्या प्रत्येकाच्या घरात देवीची प्रतिकृती स्थापन केली असून त्याची पूजा पण केली जाते. गावातील लोकांची अशी पण श्रद्धा आहे की गावातील देवीमुळे त्यांना कोरोनाची लागण होत नाही. गावातील लोकांनी अजूनपर्यंत दवाखान्याचे तोंड पाहिलेले नाही.

त्यांना कधी साप चावला किंवा कधी त्यांना खरचटले तर ते जंगली औषधीचा उपयोग करून त्यावर उपचार करतात. प्रशासनातील लोक ह्या गावात कोरोना चाचण्या घ्यायला गेले होते. पण गावकर्यांनी त्यांना सहकार्य केले नाही.

गावकर्यांनी सहकार्य न केल्यामुळे त्यांनी फक्त १७ जणांच्या चाचण्या घेतल्या आणि त्यांना परत जावे लागले. कोरोना रुग्णांचा कोणताही आकडा सरकारी प्रशासनकडे पण उपलब्ध नाही. आनंदवाडीत बाहेरून येणाऱ्या लोकांना बंदी आहे.

बाहेरून येणाऱ्या लोकांना जरी बंदी असली तरी येथे मोठ्या प्रमाणावर लग्न आणि उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे केले जात आहेत. गावातल्याच मुलं मुलींची लग्न लावली जात आहेत. अशी गावात २० लग्न झाल्याचे गावकर्यांनी सांगितले आहे. त्या लग्नांमध्ये पण एका पण व्यक्तीने मास्कचा वापर केला नव्हता आणि सामाजिक अंतर पण पळाले नव्हते.

ताज्या बातम्या
VIDEO: खड्ड्यात पडलेल्या हत्तीला जेसीबीने बाहेर काढले मग पहा पुढे हत्तीने काय केले

कोणत्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना किती मिळतो पगार? उत्तर प्रदेश आहे तिसऱ्या क्रमांकावर तर महाराष्ट्र….

“महाराष्ट्राच्या जनतेला उध्दव ठाकरे आणि नरेंद्र मोदी दोघांमध्येही भविष्य दिसत नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.