कोरोना आणि बर्ड फ्लूनंतर आता आणखी एका रहस्यमयी आजाराचं संकट; घ्या जाणून 

मुंबई | देशात अजूनही कोरोना विषाणूचा धुमाकूळ सुरूच आहे. सर्वत्र कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. मात्र कोरोना रुग्ण संख्येत सतत वाढ होताना पाहायला मिळत आहे.  तर दुसरीकडे कोरोना पाठोपाठ देशात बर्ड फ्लूचं संकट आला आहे. शेकडो पक्ष्यांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाला आहे.

तर आता आणखी एक संकट समोर आले आहे. या रहस्यमयी आजारामुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाली असून प्रशासनाची ही चिंता वाढली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशमध्ये या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत.

पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील कोमीरपल्ली गावात गेल्या ४५ दिवसांत तब्बल ७०० हून अधिक लोक आजारी पडले आहेत. याचबरोबर रहस्यमयी आजार असलेल्या लोकांना एलरू येथील एका सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून गावामध्ये मेडिकल कॅम्पचं आयोजन करण्यात आले आहे. तसेच डॉक्टरांच्या अनेक टीम्स या गावागावात जाणून लोकांची तपासणी करत आहेत. तसेच या आजाराचा नेमका शोध घेण्यासाठी नमुने जमा करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या
लस घ्यायची असल्यास सरकारच्या ‘या’ आदेशांचे करावे लागणार पालन; घ्या जाणून
शिवसेनेच्या स्वाभिमानावर फडणवीसांनी ठेवलं बोट; ‘त्या’ ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा
याला म्हणत्यात निष्ठा! शंभर कोटी व मंत्रीपदाची भाजपची ऑफर धुडकावणारा बहाद्दर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.