Share

Pune Crime News : बदला तो फिक्स! आंदेकर टोळीच्या समर्थनार्थ रील्स टाकणे पडले महागात, पोलिसांनी दाखवला जबर इंगा

Pune Crime News:  पुणे (Pune) शहरात गुन्हेगारी टोळींचं समर्थन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू केली आहे. आंदेकर टोळीच्या (Andekar Gang) समर्थनार्थ सोशल मीडियावर रील्स अपलोड करणं काही तरुणांना चांगलंच महागात पडलं. पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करत थेट धिंड काढल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदेकर टोळीच्या काही समर्थकांनी इंस्टाग्राम आणि फेसबुकसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर “Badla to fix, reply hoga. Aata fakt body moza kutryano” अशा प्रकारचे स्टेटस आणि रील्स पोस्ट केले होते. या व्हिडिओंमधून गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन मिळत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

या प्रकारानंतर समर्थ पोलीस ठाण्याचे (Samarth Police Station) अधिकारी तत्परतेने कारवाईसाठी पुढे सरसावले. मंथन सचिन भालेराव (Manthan Sachin Bhalerao), फैजान शेख (Faizan Shaikh), पियुष बिडकर (Piyush Bidkar), अथर्व नलावडे (Atharva Nalawade) आणि ओंकार मेरगु (Omkar Mergu) या तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांवर गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देण्याचा आणि कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

या घटनेमुळे पुण्यातील तरुणांमध्ये सोशल मीडियावर काय अपलोड करायचं आणि काय नाही, याबद्दल नव्याने चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, कोणत्याही गुन्हेगार किंवा टोळीच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यास थेट कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल.

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now