कोरोनामुळं आमच्या आयुष्याची वाट लागलीय आणि इथं लोकं आयपीएल खेळतायत; अभिनेत्री भडकली

नवी मुंबई | देशात कोरोनाने गेल्या वर्षभरापासून थैमान घातले आहे. वाढत्या रूग्णसंख्येमुळे देशात लस, ऑक्सिजन, बेड यांचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर निर्बंधांची घोषणा करत आहे.

कोरोनामुळे देशात रुग्णांचा मृत्यू होत आहे. कोरोनाची लाट आल्यापासून देशाच्या समोर मोठं संकंट आलं आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. चांगले शिक्षण घेऊनही रोजगाराची मोठी समस्या उद्भवली आहे.

कोरोनामुळे चित्रपट, मालिका यांचे शुटींग बंद ठेवण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्यांवरही समस्यांना सामोरं जावं लागत आहे. अशातच बॉलिवूड अभिनेत्री आणि बीग बॉस फेम राखी सावंतने राज्यातील कोरोनाने रौद रुप धारण केलं असताना आयपीएलचे सामने खेळवले जातात. असं म्हणत संताप व्यक्त केला आहे.

राखी सावंतला प्रश्न विचारण्यात आला की सध्या सुरू असलेल्या आयपीएलला ती फॉलो करे की नाही. त्यावर ती म्हणाली, “व्वा.. मुंबईत कोरोना व्हायरलमुळे लोक मरत आहेत. आमचं आयुष्य खराब होत आहे आणि इथं हे लोक आयपीएल खेळत आहेत. व्वा..”

“तुम्हाला खरं सांगु का मुंबईमध्ये लोक नाही लॉकडाऊन आहे. जसं लॉकडाऊन सुरू झालं तसे सर्वजण सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी निघून गेले आहेत. सर्वजण एन्जॉय करत आहेत. मालदीवला जात आहेत आणि तिथे जाऊन सगळा कोरोना पाण्यात वाहून येणार आहेत.” असं राखी सावतं यांनी महटलं आहे.

दरम्यान ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनूसार देशातील कोरोना रुग्णसंख्या १ कोटी ५९ लाख ३० हजार ९६५ इथवर जाऊन पोहोचली आहे. गेल्या २४ तासामध्ये देशात २,१०४ कोरोना रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. सध्या देशात अॅक्टिव्ह रूग्ण संख्या २२ लाख ९१ हजार ४२८ आहे.
महत्वाच्या बातम्या
अमिताभ बच्चनने बोनी कपूरला बनवले होते भिकारी; जाणून घ्या कारण
‘बॉबी’ चित्रपटासाठी ऋषी कपूरला अवॉर्ड भेटला नव्हता तर त्यांनी तो खरेदी केला होता
किशोर नांदलस्कर यांचा मृत्युपुर्वीचा व्हिडिओ व्हायरल; त्यांच्या चेहरेवरचे हास्य पाहून तुमचेही डोळे पाणावतील

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.